Menu Close

अंनिसच्या भ्रष्टाचाराची सूत्रे हिवाळी अधिवेशनात घेऊ !

हिंदु जनजागृती समितीने दिलेल्या निवेदनावर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांचे आश्‍वासन !

amdar-narendra-mehta_bjp
डावीकडून दीप्तेश पाटील, निवेदन स्वीकारतांना आमदार नरेंद्र मेहता आणि कुंदन राऊत

मुंबई : अंनिसच्या भ्रष्टाचाराचे सूत्र आम्ही हिवाळी अधिवेशनामध्ये घेऊ, असे आश्‍वासन भाजपचे आमदार श्री. नरेंद्र मेहता यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना दिले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अंनिस या संस्थेच्या न्यासामध्ये कोट्यवधी रुपयांच्या देशी-विदेशी देणग्या घेऊन घोटाळा झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी घोटाळेबाज अंनिसवर तात्काळ प्रशासक नेमावा आणि दाभोलकर यांच्या खुनाशी त्यांच्या ट्रस्टमधील आर्थिक व्यवहार कारणीभूत आहेत का, याची कसून चौकशी व्हावी, यासाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवावा, या विनंतीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदार श्री. नरेंद्र मेहता यांना देण्यात आले. त्या वेळी त्यांनी वरील आश्‍वासन दिले.

निवेदन देतांना हिंदु गोवंश रक्षा समितीचे श्री. दीप्तेश पाटील आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. कुंदन राऊत उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *