थोरांगलु (बल्लारी, कर्नाटक) : हिंदुस्थानचा आत्मा धर्म आहे. आपल्या मुलांना शाळांमध्ये कसे शिक्षण मिळत आहे, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर त्यांच्या आईने धर्म आणि राष्ट्र यांचे संस्कार केले. त्यामुळे त्यांनी हिंदवी राष्ट्र स्थापन केले. यातून प्रेरणा घेऊन प्रत्येक आईने तिच्या मुलांना धर्मशिक्षण शिकवणे आणि त्यांना मंदिरांमध्ये पाठवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन धर्माभिमानी श्री. अरविंद थलावर यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील मदारी हिरिया प्राथामिक शाळेच्या पटांगणात २७ नोव्हेंबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला समितीचे श्री. पुंडलिक पै, सनातन संस्थेच्या कु. नागमणी आचार्य, रणरागिणी शाखेच्या कु. संगीता जानू यांनी संबोधित केले. या सभेला ७२५ हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.
धर्माचरण आणि साधना नियमितपणे करा ! – कु. नागमणी आचार
सुखाचे मूळ धर्माचरणात आहे. पाश्चात्यांच्या प्रभावामुळे आम्ही सर्व धर्माचरणाच्या कृती विसरून गेलो आहोत. आपण धर्माचरण म्हणून काही कृती अवश्य केल्या पाहिजे. मुसलमानांना गोल टोपी घालण्याची लाज वाटत नाही, तर आपण लाल टिळा लावायला का लाजतो ?
अन्यायाच्या विरोधात जागृत व्हा ! – श्री. पुंडलिक पै
हिंदूनो, उठा जागृत व्हा, आपले राज्य स्थापन करा, हा मूळ संदेश देण्यासाठीच धर्मजागृती सभा आहे. हिंदु राष्ट्र म्हणजे रामराज्य ! रामराज्यासाठी राज्यकर्ताच नाही, तर प्रजाही सात्त्विक आणि प्रामाणिक असली पाहिजे. यासाठी शासन आणि सामाजिक क्षेत्र यांमधील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात जागृती होण्याची आवश्यकता आहे.
स्त्रीशक्ती जागृत होणे आवश्यक आहे ! – सौ. संगिता जानू
जम्मू काश्मीरच नाही, तर देशाच्या इतर राज्यांतही काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण होत आहे. हिंदूंना त्यांची घरे सोडून विस्थापित होण्याची वेळ आली आहे. या सर्वांशी लढण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
क्षणचित्रे
१. दोन व्यावसायिक असणार्या युवकांना समितीविषयी काहीही माहिती नसतांना त्यांनी सभेच्या आदल्या दिवशी आणि सभेच्या दिवशी धर्मकार्य म्हणून सभेच्या संदर्भातील सेवांमध्ये सहभाग घेतला.
२. तोरांगलु या गावात दोन धर्मशिक्षण वर्ग होतात. या वर्गात येणार्या कार्यकर्त्यांनी ३ दिवस साधकांची रहाण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली.
हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित राहिल्याने जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटत आहे ! – श्री. अरविंद थलावर, धर्माभिमानी
हिंदु धर्मजागृती सभेच्या व्यासपिठावर उपस्थित रहाण्याचे मला भाग्य मिळाले, हे माझे पूर्वसुकृत समजतो. मी अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहिलो आहे; परंतु हिंदु जनजागृती समितीच्या सभेला प्रथमच वक्ता म्हणून आलो आहे. आज मला जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटत आहे.
बागलकोट (कर्नाटक) येथील अरकेरीमध्ये हिंदु धर्मजागृती सभेला उत्साही प्रतिसाद !
बागलकोट (कर्नाटक) : येथील अरकेरी गावात २० नोव्हेंबरला हिंदु जनजागृती समितीकडून आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला उत्साही प्रतिसाद मिळाला. या वेळी रणरागिणी शाखेच्या डॉ. (सौ.) ज्योती हलगुणकी, सनातन संस्थेच्या सौ. विदुला हळदीपूर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. व्यंकटरमण नायक यांनी मार्गदर्शन केले. या सभेचा ३५५ ग्रामस्थांनी लाभ घेतला. यात ९० विद्यार्थ्यांचाही समावेश होता. या सभेची संपूर्ण सिद्धता येथील धर्माभिमान्यांनी केली. श्री. व्यंकटरमण नायक यांनी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि धर्मरक्षण यांविषयी मार्गदर्शन केले. तसेच लव्ह जिहादविषयी जागृती केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात