Menu Close

निमकर्दा (अकोला) येथे हिंदु धर्मजागृती सभा

akola_hj-sabha
डावीकडून सौ. माधुरी मोरे, श्री. श्रीकांत पिसोळकर आणि श्री. धीरज राऊत

निमकर्दा :  येथील श्री निळकंठेश्‍वर संस्थानच्या सभागृहामध्ये ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने आयोजित ‘हिंदु धर्मजागृती सभा’ नुकतीच पार पडली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर, समितीचे श्री. धीरज राऊत, रणरागिणी शाखेच्या सौ. माधुरी मोरे यांनी उपस्थित धर्माभिमान्यांना मार्गदर्शन केले. या सभेला ह.भ.प विश्‍वराम पांडे महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती. धर्माभिमानी श्री. महेश पाथरकर यांनी शंखनाद करून सभेचा प्रारंभ केला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. वेदमंत्रांनी सभागृह चैतन्यमय झाले. कु. निधी बैस हिने सूत्रसंचालन केले. उपस्थित वक्ते आणि ह.भ.प. विश्‍वराम पांडे महाराज यांचा सत्कार धर्माभिमान्यांनी केला. या सभेस ४०० धर्माभिमानी उपस्थित होते.

समितीचे श्री. धीरज राऊत यांनी समितीच्या कार्याचा परिचय करून दिला, तसेच हिंदु धर्मावर होणारे विविध आघात रोखण्यासाठी धर्माचरणाची आवश्यकता आणि ते थांबवण्यासाठी करावयाचे उपाय यांविषयी मार्गदर्शन केले. रणरागिणी शाखेच्या सौ. माधुरी मोरे यांनी ‘आत्मबळ वाढवून स्त्रीशक्ती जागृत करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता आहे’, असे सांगितले. समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी करावयाचे प्रयत्न आणि साधनेची आवश्यकता यांविषयी सांगितले.

सभेसाठी निमकर्दा येथील सर्वश्री अक्षय उकर्डे, तुषार टाले, धीरज उमाळे, विशाल खेळकर, देवानंद साबळे, सागर निंबेकर, उमेश ठाकरे, मुकेश, नितीन गव्हाणकर, वैभव मावळे, पवन उकर्डे या तरुणांनी विशेष परिश्रम घेतले.

विशेष आभार : श्री. पप्पू दाणे यांनी विनामूल्य ध्वनीक्षेपक यंत्रणा उपलब्ध करून दिली. श्री. विशाल खेळकर यांनी १ सहस्र हस्तपत्रके विनामूल्य छापून दिली. (कृतीशील धर्माभिमान्यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

क्षणचित्रे : उपस्थित धर्माभिमानी शेवटपर्यंत थांबले. सभेत पुष्कळ शांतता होती. ‘यापूर्वी अशी सभा झाली नाही’, असे ग्रामस्थांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *