धर्मरक्षणार्थ हिंदु संतांना कृतीप्रवण व्हावे लागते, हे हिंदूंसाठी लज्जास्पद !
भाग्यनगर (हैद्राबाद) : हिंदु धर्मावर होत असलेल्या आघातांचा सामना करणे आणि धर्माची होणारी हानी रोखणे यांसाठी विशिष्ताद्वैत संप्रदायचे श्री श्री श्री चिन्ना त्रिदंडी श्रीमंनारायना जीयर स्वामीजी, श्रीपीठं काकीनाडा, भारत टुडे वाहिनीचे मुख्य श्री श्री श्री परिपूर्णानंद स्वामीजी आणि मंत्रालयम्, आंध्रप्रदेश येथील श्री सुबुधेन्द्र स्वामीजी यांनी संयुक्तपणे हिंदु धर्माचार्य प्रतिष्ठान या संस्थेची नुकतीच स्थापना केली.
या निमित्ताने स्थनिक ज्युबली हिल्स या भागात हिंदु धर्माच्या क्षेत्रात कार्यरत संघटनांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत या संस्थेचे धोरण आणि स्वरूप स्पष्ट करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. विनुता शेट्टी आणि सौ. तेजस्वी वेंकटापूर, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
धर्मविरोधकांचे तोंड बंद करणे आमचे कर्तव्य आहे ! – श्री श्री श्री परिपूर्णानंद स्वामीजी
केवळ धर्माचे रक्षण करण्यासाठी तीन संप्रदाय एका व्यासपिठावर एकत्र आले आहेत. आम्ही सर्व मिळून एकाच कामावर लक्ष केंद्रित केले, तर लवकरच हिंदु धर्माच्या स्थितीत पालट घडून येऊ शकतो. वैष्णव संप्रदाय, शैव संप्रदाय, अद्वैत संप्रदाय, विशिश्ताद्वैता संप्रदाय कोणीही असो, सर्वांनी आम्ही हिंदु आहोत या विचाराने एक होणे महत्त्वपूर्ण आहे. आम्ही सर्व हिंदु धर्मासाठी कार्य करणार आहोत. धर्मविरोधी जे कार्य चालू आहे, त्याविषयी लोकांना जागृत करायचे आहे. देवी-देवतांचा अवमानही आम्ही सहन करणार नाही. आमच्या धर्माला जे विरोध करतील, त्यांना आम्ही सडेतोड उत्तर देणार. आज हिंदु धर्माच्या विरोधात जे कोणी बोलत आहेत, त्यांचे तोंड बंद करणे आमचे कर्तव्य आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात