बेंगळुरू : कर्नाटक राज्याचे उर्जामंत्री डी.के. शिवकुमार यांची हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा, श्री. काशिनाथ शेट्टी, अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर आणि सौ. विदुला हळदीपूर यांनी भेट घेतली. त्यांना समितीकडून कर्नाटक सरकारच्या प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला विरोध करणारे निवेदन देण्यात आले. तसेच कर्नाटकातील अनेक हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्यांचा आरोप असणार्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या जिहादी संघटनेवर बंदी घालण्याचीही मागणी करण्यात आली. या वेळी शिवकुमार यांनी ‘मी या मागण्यांकडे लक्ष घालतो’, असे आश्वासन दिले.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात