उडुपी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
उडुपी (कर्नाटक) : कर्नाटकातील उडुपी येथे २७ नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. यामध्ये हिंदु जनजागृती समिती, श्रीराम सेना, सनातन संस्था, माता अमृतानंद इत्यादी संघटना सहभागी झाल्या होत्या. या आंदोलनामध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या.
१. डॉ. झाकीर नाईक यांना भारतात परत आणा. त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करा. त्यांच्या भारतातील ‘पीस स्कूल’ बंद पाडा.
२. कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू येथे झालेल्या हिंदु नेत्यांच्या हत्या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे चौकशी करा. (या मागण्या लोकांना का कराव्या लागतात, सरकारच्या ते लक्षात का येत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. कर्नाटकातील प्रस्तावित अंधश्रद्धा कायदा सरकारने रहित करा.
हिंदु जनजागृती समितीच श्री. विजय कुमार यांनी डॉ. झाकीर यांना भारतात आणून सामाजिक सलोखा बिघडवल्याच्या प्रकरणी त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. श्रीराम सेनेचे उडुपी अध्यक्ष श्री. मोहन भट यांनी हिंदु नेत्यांच्या हत्यांच्या प्रकरणी खेद व्यक्त केला. श्रीराम सेनेचे प्रवक्ता श्री. जयराम हब्बिकल्लु यांनी श्रीराम सेनेचा प्रस्तावित अंधश्रद्धा कायद्याला विरोध असल्याचे सांगितले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोपाळकृष्ण मल्ल्या यांनीही मार्गदर्शन केले. या आंदोलनात एकूण ६८ धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात