Menu Close

जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराला वेग !

jalgaon_sabha_sticker

जळगाव :  जळगावनगरीत २५ डिसेंबर २०१६ या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेचा दिनांक जवळ येऊ लागला आहे, तसा शहर आणि ग्रामीण भागांत सभेच्या प्रचारकार्याला वेग येत आहे. अनेक धर्माभिमानी, हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय यांनी ही सभा यशस्वी करण्याचा मानस व्यक्त केला आहे. अनेक जण आपापल्या परीने यथाशक्ती नवनवीन संकल्पनांचा वापर करून सभेचा प्रसार करत आहेत.

या सभेच्या प्रचारासाठी ग्रामीण भागांत अनेक मोठ्या गावांमध्ये सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांपैकी झालेल्या काही सभांना लोकांचा उत्स्फूर्त प्र्रतिसाद मिळाला आहे. शहरात रहाणारे हिंदु धर्माधिमानी श्री. गजानन तांबट यांनी हिंदु धर्मजागृती सभेसाठीचे रेडियम स्टिकर अल्प दरात उपलब्ध करून दिले आहेत. ते स्टिकर दुचाकी, चारचाकी गाड्यांवर लावण्यासाठीही अनेक धर्माभिमानी युवक पुढे येत आहेत. दोनच दिवसांमध्ये १०० हून अधिक स्टीकर लावण्यात आले आहेत, असे श्री. तांबट यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *