ठाणे : शासनाची फसवणूक करून अर्थिक घोटाळे करणार्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र (सातारा)’वर प्रशासक नेमण्याविषयी ठाणे जिल्ह्यात भिवंडी येथील आमदार श्री. महेश चौगुळे आणि कल्याण येथील आमदार श्री. नरेंद्र पवार यांना निवेदन देण्यात आले.
ट्रस्टवर प्रशासक नेमावा आणि ट्रस्टचे ‘विशेष लेखा परिक्षण’ करावे, ट्रस्टवरील गंभीर आरोपांची मोघम चौकशी केल्यामुळे पुन्हा फेरचौकशी करावी, अशी महत्त्वपूर्ण शिफारस सातारा येथील ‘सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालया’च्या अधीक्षकांनी १६.०७.१६ या दिवशी चौकशी अहवालावर केली आहेत. अधीक्षकांनी नमूद केलेल्या निरीक्षणांनुसार घोटळेबाज ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’वर तत्काळ प्रशासक नेमावा आणि सनातन संस्थेने वारंवार सांगितल्यानुसार ‘दाभोलकरांच्या खुनाशी त्यांच्या ट्रस्टमधील आर्थिक गैरव्यवहार कारणीभूत आहेत का ?’, याची कसून चौकशी करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात