-
४०० मंडळांना नोटिसा
-
१०० पेक्षा अधिक खटले
हिंदूंच्या उत्सव मंडळांवर कारवाई करण्यास कर्तव्यतत्परता दाखवणारे पोलीस मशिदींच्या बाबतीत कर्तव्यचुकार का होतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : उच्च न्यायालयाचा आदेश आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश यांनुसार ध्वनीप्रदूषण करणार्या शिवजयंती, गणेशोत्सव यांसह अन्य उत्सव साजरे करणार्या मंडळांवर पुणे पोलीस गुन्हे प्रविष्ट करत आहेत. ४०० उत्सव मंडळांना ध्वनीप्रदूषणाच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, तर १०० पेक्षा अधिक जणांवर खटले प्रविष्ट करण्यात आले आहेत; मात्र त्याच वेळी न्यायालयाने मशिदींवरील बेकायदा भोंगे काढण्याचेही आदेश दिले आहेत. पुण्यात एकेका मशिदीवर १० ते १२ भोंगे आहेत; पण त्यावर कारवाई करण्यास पोलीस कचरत आहेत. मशिदींच्या भोंग्यांना मोकाट साडून पोलीस केवळ हिंदूच्या सणांना लक्ष्य करत असल्याने कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे.
गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव, दहीहंडी यांसह अन्य सणांच्या वेळी मंडळांकडून पोलिसांच्या अनुमतीनेच ध्वनीक्षेपक लावले जातात, तसेच मिरवणुका काढल्या जातात. मंडळाचे अध्यक्ष, ढोल-ताशा पथक, ध्वनीक्षेपकवाले या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित मंडळांनी ५५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज ठेवून ध्वनिप्रदूषण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. संबंधित मंडळांनी योग्य खुलासा केला, तरी तो पोलिसांना न पटल्यास त्याच्यावर खटला भरला जात आहे. या कारवाईमुळे संतापाची लाट उसळली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात