Menu Close

येणार्‍या संकटकाळात प्रथमोपचार ही संजीवनी ठरणार ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ

first_aid_hjs_ss

रामनाथी (गोवा) : काळानुसार संपत्काळात सर्व काही व्यवस्थित असते.आपत्काळ हा विविध आपत्तींचा असतो. यामध्ये पूर, भूकंप, वादळ, सुनामी आदी आपत्तींमधून जीवित आणि संपत्तीची हानी होते. यापेक्षा युद्धकाळात नरसंहार होऊन लक्षावधी लोक घायाळ होतात. अशा संकटकाळात प्रथमोपचार ही संजीवनी ठरणार आहे. खरेतर शासनकर्त्यांनी नागरिकांना निःशुल्क प्रथमोचार दिले पाहिजेत; मात्र आज शासनकर्ते त्यांच्या कर्तव्यापासून दूर आहेत. त्यामुळे काळाची पावले ओळखून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था या स्वयंसेवी संस्थांनी संयुक्तपणे प्रथमोपचार प्रशिक्षण हा समाजसाहाय्यविषयक उपक्रम चालू केला आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांनी केले. ते या ठिकाणी आयोजित तीन दिवसीय प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या शिबिरासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमधील ६० शिबिरार्थी सहभागी झाले आहेत.

श्री. राजहंस पुढे म्हणाले, ‘‘२० व्या शतकात दोन्ही महायुद्धांच्या काळात ‘रेड क्रॉस’ या संघटनेच्या माध्यमातून रुग्णसेवेच्या नावाखाली ख्रिस्ती धर्मगुरु आणि प्रसारक यांनी मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवून आणले. भारतातही नंतरच्या काळात मदर तेरेसा कथित स्वर्गप्राप्तीच्या नावाखाली रुग्णास मृत्यूपूर्वी बाप्तिस्मा देऊन त्यांचे धर्मांतर करत. ख्रिस्त्यांच्या या दृष्कृत्यास उत्तर देण्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी धर्मरक्षणाच्या हेतूने ‘रामकृष्ण मिशन’ या संस्थेची स्थापना केली. त्याद्वारे हिंदु रुग्ण हा हिंदूंच रहावा, यासाठी प्रयत्न केले. येणार्‍या आपत्तींमध्ये प्रथमोपचारांद्वारे समाजसाहाय्य होऊन समाजाला हिंदु संघटनांचा आधार वाटेल आणि ते हिंदु संघटनांचे हितचिंतक बनतील. ‘योगः कर्मसु कौशलम्’ या सिद्धांतानुसार कृती केल्यास आपली साधना होते. प्रत्येक विद्या ईश्‍वरप्राप्ती करवून देते. त्यानुसार प्रथमोपचार ही सेवा साधना म्हणून कुशल आणि परिपूर्णतेने केल्यास आपला प्रवास प्रथमोपचार करणारे साधक ते प्रथमोपचार करणारे शिष्य आणि नंतर प्रथमोपचार करणारे संत, असा होईल. यातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित साधना घडून आपण ईश्‍वरप्राप्ती करू शकू.’’

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित या प्रथमोेपचार प्रशिक्षण शिबिरात हितचिंतक आधुनिक वैद्य, परिचारक आणि परिचारिका यांनी तात्त्विक अन् प्रायोगिक सत्रांतून मार्गदर्शन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *