Menu Close

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीकडून ताणतणाव या विषयावर व्याख्यान

sugandhi_jaykumar

चेन्नई (तमिळनाडू) : अण्णानगरमधील वाळियम्मल उच्च माध्यमिक शाळेमध्ये २५ नोव्हेंबरला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ताणतणाव या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. इयत्ता बारावीच्या सुमारे १३० विद्यार्थ्यांनी आणि दहावीच्या ८० विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.

समितीच्या वतीने सौ. सुगंधी जयकुमार आणि श्री. श्रीराम लुकतुके यांनी या वेळी मार्गदर्शन केले. या वेळी चर्चासत्रही आयोजित करण्यात आले होते. बर्‍याच विद्यार्थ्यांनी त्यांना वरचेवर ताणतणावाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले; मात्र त्यावर कायमचा तोडगा कसा काढायचा, याविषयी अनभिज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले. ताणविरहीत जीवन जगण्याच्या दृष्टीने दोष घालवणे आणि नीतीमूल्यांचे संवर्धन करणे किती महत्त्वाचे आहे, याविषयी विद्यार्थ्यांना संगणकीय प्रणालीद्वारे माहिती देण्यात आली. ही प्रक्रिया केवळ शालेय जीवनापुरतीच नव्हे, तर संपूर्ण जीवनभर महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले.

व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी बर्‍याच शंका उपस्थित केल्या. सौ. सुगंधी जयकुमार आणि श्री. श्रीराम लुकतुके यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. शाळेच्या प्राचार्यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक केले. शिक्षणाबरोबरच व्यक्तीमत्व विकास महत्त्वाचा आहे. अशा प्रकारचे व्याख्यान शिक्षकांसाठी आयोजित करण्याची विनंती त्यांनी समितीला केली.  सौ. कल्पना बालाजे आणि सौ. सुधा गोपालकृष्णन् यांनी ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी खूप प्रयत्न केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *