बेळगाव : २२ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत बेळगाव येथे कर्नाटक राज्याच्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्यशासनाचे विविध सचिव आणि विविध पक्षांचे आमदार यांंना प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक रहित करावे आणि देशविरोधी कारवाया करणार्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेवर बंदी घालण्यात यावी, या आशयाचे निवेदन देण्यात आले. हे निवेदन मध्यम आणि मोठे हस्तकला मंत्री श्री. आर्.व्ही. देशपांडे, तसेच लघुउद्योग सचिव श्री. रमेश जारकीहोळी यांनाही देण्यात आले. त्याचप्रमाणे भाजपचे विरोधी पक्ष नेते श्री. जगदीश शेट्टर, आमदार सी.टी. रवी, श्री. विश्वेश्वर भट, श्री. सुरेश कुमार, श्री. आर्.अशोक, श्री. ईश्वरप्पा, श्री. रवी सुब्रह्मण्यम्, श्री. कुष्णप्पा, श्री. मुनिराजु तसेच विधान परिषदेचे सदस्य वी. सोमण्ण, श्री. मांतेश कवटिगीमठ, श्री. रामचंद्रेगौडा यांना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेवर बंदी घालण्यासाठी निवेदन देण्यात आले. वरील सर्वांनी ‘याविषयावर आम्ही विधानसभा अधिवेशनात ठराव मांडू’, असे आश्वासन दिले. त्यानुसार भाजप आमदारांनी अधिवेशनात विषय मांडला.
निवेदन देणार्या शिष्टमंडळात अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा, सौ. विदुला हळदीपूर, श्री. सुदीप बेळगावी, श्री. काशीनाथ शेट्टी आणि श्री. विजय कुमार हे सहभागी झाले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात