जळगाव येथील विराट हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त घार्डी (ता. जळगाव) येथे सभा !
जळगाव : या देशात बहुसंख्य हिंदू असतांना हिंदूंच्या भावनांना किंमत दिली जात नाही. अल्पसंख्यांकांच्या धार्मिक यात्रांवर अनुदानाची खैरात केली जाते, तर हिंदूंच्या यात्रांवर कर लादले जातात. अशा प्रकारचा भेदभाव करायचा आणि धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी करायच्या, हा ढोंगीपणा आता हिंदू खपवून घेणात नाहीत. या देशात समान नागरी कायदा व्हायलाच हवा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी घार्डी (ता. जळगाव) येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत केले. जळगाव येथे २५ डिसेंबर या दिवशी विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. त्याच्याच प्रचाराचा एक भाग म्हणून या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला श्री. प्रशांत जुवेकर यांच्यासोबत हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी संबोधित केले. सभेचे सूत्रसंचालन श्री. शैलेश पोळ यांनी केले.
रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी लव्ह जिहाद, धर्मांतर, पाश्चात्यांचे अंधानुकरण यांमुळे होणारी धर्महानी, तसेच धर्मशिक्षण घेण्याचे अन् धर्माचरण करण्याचे महत्त्व विषद केले. या सभेला विद्गावचे श्री. जनार्दन कोळी यांची उपस्थिती लाभली. केवळ ६०० ते ७०० लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा गावात ३५० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात