Menu Close

पिंपरी (पुणे) येथील कुल जमाअती तंजीम आयोजित निषेध सभेत असदुद्दीन ओवैसी अनुपस्थित !

हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणाचे यश !

Owaisiपिंपरी (पुणे) : येथील एच्ए आस्थापनाच्या पटांगणावर ३० नोव्हेंबर या दिवशी झालेल्या कुल जमाअती तंजीमआयोजित सरकारविरोधाच्या निषेध सभेत असदुद्दीन ओवैसी अनुपस्थित राहिले. समस्त हिंदु संघटनांच्या वतीने ही सभा रहित करण्याच्या संदर्भात पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले होते. हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित प्रयत्नांची परिणती एम्आयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी या सभेला अनुपस्थित रहाण्यात झाली.

१. या सभेत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य उबेदुल्ला खान आझमी म्हणाले, केंद्रशासन मुसलमान महिलांची काळजी करत असल्याचा देखावा करून तीन वेळा तलाक देण्याच्या सूत्रावरून मुसलमान कायद्यात पालट करू पहात आहे. या पालटाच्या विरोधात पाच कोटी मुसलमान महिलांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या. केंद्रशासनाचा हा हस्तक्षेप म्हणजे संविधानाला धोका आहे. (मुसलमानांना मुख्य प्रवाहात मिसळून न जाता त्यांना त्यांचे वेगळे अस्तित्व ठेवायचे आहे, हेच यावरून लक्षात येते. मुसलमानांसाठी वेगळे कायदे हाच उलट संविधानाला धोका आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

२. ते पुढे म्हणाले, संविधानाच्या तरतुदीनुसारच मुसलमानांसाठी शरियत कायदा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या कायद्यात हस्तक्षेप करणे लाजिरवाणे आहे. मुसलमानांना नोकरी आणि रोजगार यांची संधी दिली जात नाही. (देशात मुसलमानांचे इतके लांगुलचालन होत की, हा देश हिंदूंचा कि मुसलमानांचा हा प्रश्‍न पडावा. मुसलमानांना इथे अन्याय होतो, असे वाटत असेल, तर त्यांनी खुशाल तत्परतेने देश सोडून निघून जावे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *