कराड : हिंदू आणि हिंदु धर्म यांवर होणार्या विविध आघातांच्या संदर्भात येथील नायब तहसीलदार सौ. मीनल भामरे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गृहमंत्र्यांकडे द्यावयाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. साळवी, अभिजीत देशमुख, सनातनचे साधक आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
निवेदनाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या मागण्या
१. केरळ आणि कर्नाटक येथील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्यांमागील सूत्रधार, तसेच ही प्रकरणे दडपण्यासाठी प्रयत्न करणारे यांचा माग काढून त्यांच्यावर कारवाई व्हावी, या प्रकरणांची चौकशी करण्यास राज्य शासन अपयशी ठरत असल्याने या प्रकरणांची केंद्रीय स्तरावरून सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना करावी, हा तपास एका ठराविक कार्यमर्यादेत करावा आणि कर्नाटक आणि केरळ राज्यातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना संरक्षण पुरवण्याचे आदेश केंद्र शासनाने द्यावेत !
२. बंगालमध्ये होणार्या दंगली आणि हिंदूंवर अत्याचार करणार्या धर्मांधांवर कारवाई करावी आणि अशा घटनांत केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करून हिंदूंचे संरक्षण करावे !
३. डॉ. झाकीर नाईक यांचे प्रत्यार्पण करून भारतात आणावे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि देशभरातील ‘पीस स्कूल’च्या सर्व शाळांवर बंदी घालावी !
४. ३१ डिसेंबरला नववर्षोत्सवाच्या नावाखाली प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार थांबवावेत !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात