Menu Close

देशभरातील ‘पीस स्कूल’वर बंदी घालण्यासाठी यवतमाळ येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

hjs_logo

यवतमाळ : आतंकवादाला खतपाणी घालणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांचे प्रत्यार्पण करून त्यांना भारतात आणावे, त्यांच्यावर कठोर कारवाई करून देशभरातील ‘पीस स्कूल’वर बंदी घालावी, यासाठी केंद्रीय गृहमंत्री यांच्या नावे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना ३० नोव्हेंबर या दिवशी निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी नायब तहसीलदार अजय गौरकार यांनी ते स्वीकारले. निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत सोळंके आणि श्री. दत्ता फोकमारे उपस्थित होते.

याच निवेदनात कर्नाटक आणि केरळ राज्यांमध्ये हिंदु नेत्यांच्या हत्या प्रकरणाचा संपूर्ण तपास केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात यावा, अशी मागणी समितीच्या वतीने गृहमंत्र्यांना करण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *