Menu Close

बांग्लादेशात जिहाद्यांनी दु्र्गादेवीच्या तीन मूर्ती तोडल्या, गावात तणावाचे वातावरण

बांगलादेशातील हिंदूंच्या मंदिरांवर होणारी आक्रमणे थांबविण्यासाठी सरकार काही ठाेस पावले उचलतील का ? – संपादक, हिंदुजागृति

ढाका – बांग्लादेशातील नेट्रोकोना येथे जिहाद्यांनी दुर्गादेवीच्या तीन मूर्ती तोडल्यानंतर या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नेट्रोकोना जवळील मायमेन सिंह होरोली या गावात शनिवारी रात्री ही घटना घडली. जेव्हा गावकरी सकाळी मंदिरात आले तेव्हा मंदिराची दारे उघडी दिसली.

आत पाहिल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की मंदिरातील मुर्तींचे काही तुकडे अस्ताव्यस्त पडलेले आहेत. मंदिरात मुर्तीच नव्हत्या. मंदिरापासून सुमारे २०० मीटर्स अंतरावर या दुर्गादेवीच्या तीन मूर्ती सापडल्या. या घटनेनंतर गावकऱ्यांनी पोलिसांना बोलवले.

मंदिराची विटंबना झाल्याचा पुरावा आमच्या हाती लागल्यानंतर आम्ही अज्ञात समाजकंटकांविरुद्ध धार्मिक तेढ वाढविण्याचा गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी म्हटले. मंदिराच्या दारांना कुलुप लावण्यात आलेले नव्हते. त्यामुळे या समाजकंटकांना आत येणे सोपे झाले.

आम्ही या घटनेचा तपास सुरू केला असून लवकरच त्यांना अटक करू असे पोलिसांनी म्हटले आहे. दोन समाजामध्ये विनाकारण तेढ वाढविण्याच्या हेतूने ही घटना झाली असावी असे प्रथमदर्शनी दिसते,असे पोलिसांनी म्हटले. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी सर्वांना शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे.

स्त्रोत : लोकसत्ता

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *