बांगलादेशात कोणीही धर्मनिरपेक्ष नसल्याने अल्पसंख्यांक हिंदूंच्या रक्षणासाठी किंवा त्यांच्या साहाय्यासाठी पुढे येत नाही, तसेच तेथील एकही लेखक बांगलादेशला असहिष्णु म्हणत नाही किंवा पुरस्कारही परत करत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ढाका : बांगलादेशमधील बोचागंज उपजिल्ह्यात धर्मांधांनी भल्या पहाटे हिंदूंच्या १० घरांना आग लावून ती भस्मसात केली. दुर्गापूजेच्या समारंभात हिंदूंशी झालेल्या वादाचा सूड घेण्यासाठी धर्मांधांकडून हे कृत्य करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. या प्रकरणी हिंदूंनी ज्युवेल राणा नावाच्या धर्मांधास पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. या घटनेत हिंदूंची अनुमाने ५० लक्ष टक्याची (बांगलादेशी चलन) हानी झाली आहे. या घटनेमुळे हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
धर्मांधांनी आग लावण्यासाठी पेट्रोलचा वापर केल्याने आग त्वरित पसरली. अग्नीशामक दलाने आग आटोक्यात आणली, तरी तोपर्यंत बरीच हानी झाली होती, असे बोचागंजचे नगरसेवक जहांगीर आलम लीतोन यांनी सांगितले. ज्युवेल राणा ही अपराधी प्रवृत्तीची व्यक्ती असून तिच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे प्रविष्ट झाले आहेत. १० ऑक्टोबरला ज्युवेल राणा हा दुर्गापूजा मंडपात खंडणी वसूल करण्यासाठी गेला असता त्याचा काही हिंदूंशी वाद झाला. तेव्हा त्याने मंडपातील कापडी फलक फाडून टाकले आणि सूड घेण्याची धमकी दिली, असे बोचागंज पोलीस ठाण्याचे प्रभारी हबिबूर इस्लाम यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात