- भारतात अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांवर कथित दगड जरी भिरकावण्यात आला, तरी देश-विदेशातील त्यांचे धर्मबंधू त्वरित त्याविरोधात बोलू लागतात; पण भारतातील हिंदू, त्यांचे नेते आणि संघटना हिंदूंविषयी काही बोलत नाहीत !
- संरक्षणमंत्री पर्रीकर नुकतेच बांगलादेशच्या दौर्यावर जाऊन आले; मात्र त्यांनी कोठेही तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी काही प्रयत्न केले, असे निदर्शनास आले नाही !
- भारत सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना याविषयी काहीही करणार नाहीत, हे जाणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ढाका : मुसलमानबहुल बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य करण्यात आले आहे. धर्मांधांनी २ विविध घटनांमध्ये येथील मंदिरांतील कालीमातेच्या ७ मूर्तींची तोडफोड केली आहे. गेल्या मासात येथील ब्राह्मणबरिया जिल्ह्यातील नसीरननगरमध्ये हिंदूंची २० मंदिरे आणि १५० घरे यांवर आक्रमण करण्यात आले होते. यांत २०० हून अधिक हिंदू घायाळ झाले होते.
१. ४ डिसेंबरला पहिली घटना बांगलादेशच्या उत्तरी नेत्रोकोना जिल्ह्यातील मिमेनसिंहरोही गावात घडली, तर दुसरी पबना जिल्ह्यातील बीरा भागात घडली.
२. बांगलादेशमधील वर्तमानपत्र ढाका ट्रिब्यूनने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ४ डिसेंबरला नेत्रोकोना भागातील मंदिरावर आक्रमण करून तेथील कालीमातेच्या ४ मूर्तींची तोडफोड करण्यात आली. सकाळी भाविक मंदिरात आले असता त्यांना मूर्तींची तोडफोड झाल्याचे दिसून आले. यातील काही प्रतिमांचे तुकडे ६०० फूट अंतरावर टाकण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस येथे पोचले. त्यांनी याची चौकशी चालू केली आहे.
३. पबना जिल्ह्यातही याच दिवशी सकाळी मंदिरातील कालीमातेच्या ३ मूर्तींची तोडफोड करण्यात आली.
४. नेत्रोकोना पोलीस ठाण्याचे प्रभारी शाहनूर-ए-आलम यांनी सांगितले की, प्राथमिक अन्वेषणात लक्षात आले की, मंदिराचे दरवाजे उघडे होते. त्यांना टाळे लावण्यात आले नव्हते. (मंदिराला टाळे नाही; म्हणून धर्मांधांनी आत घुसून मूर्तीची तोडफोड करावी, असे आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
५. नेत्रोकोनाचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी अब्दुल मतीन यांनी घटनास्थळी भेट दिली. ते म्हणाले की, अपराध्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
६. शरीफपूर काली मंदिर समितीचे सचिव बादल घोष यांनी अपराध्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात