नोव्हेंबर मासाच्या दुसर्या आठवड्यात केरळ राज्यातील धर्मप्रसार
१. एर्नाकुलम् जिल्हा
‘केरळ येथील एर्नाकुलम् जिल्ह्यातील पळुरुत्ती या ठिकाणी एस्एन्डीपी नावाच्या संघटनेच्या बैठकीत एक प्रवचन घेण्यात आले होते. सौ. शालिनी सुरेश यांनी ‘पाप-पुण्य’ या विषयावर मार्गदर्शन केले आणि याचा लाभ ४५ जणांनी घेतला. या ठिकाणी सध्या नियमित प्रवचन चालू झाले आहे.
२. कोट्टयम् जिल्हा
कोट्टयम् येथील कोडुमालून या ठिकाणी एका मंदिरात भागवत सप्ताह चालू होता. त्या निमित्ताने समितीच्या कार्यकर्त्यांना प्रवचन घेण्यास बोलवले होते. कु. रश्मी परमेश्वरन् यांनी ‘धर्माचरण’ या विषयावर मार्गदर्शन केले. याचा लाभ ७० जणांनी घेतला.
२ अ. दोन मासांपूर्वी प्रवचनास उपस्थित राहिल्यानंतर महिलेने नामजपास आरंभ करणे आणि तिला आलेली अनुभूती : या मंदिरातच दोन मासांपूर्वी समितीच्या वतीने एक प्रवचन झाले होते. त्या वेळी दत्ताच्या नामजपाविषयी सांगण्यात आले होते. त्या वेळी आलेली एक महिला या प्रवचनालाही उपस्थित होती. तिने आता नामजपास आरंभ केल्याचे सांगितले. त्या महिलेच्या तोंडवळ्यातही पुष्कळ पालट जाणवत होता. तिच्या पतीचे मद्यपान आता थांबले आहे, असेही तिने या वेळी सांगितले.’
– कु. अदिती सुखटणकर, केरळ
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात