Menu Close

राममंदिराची उपेक्षा हेच राज्यकर्त्यांचे आतापर्यंतचे धोरण !

बाबरी ढाचा उद्ध्वस्त केल्याच्या घटनेला ६ डिसेंबर २०१६ या दिवशी २४ वर्षे पूर्ण !

एक बाबरी ढाचा पाडला; म्हणून भारतात निधर्मी आणि धर्मांध ६ डिसेंबर हा दिवस ‘काळा दिवस’ साजरा करतात. मुसलमान
आक्रमणकर्त्यांनी हिंदूंची लक्षावधी मंदिरे पाडली. त्याचा निषेध करण्यासाठी हिंदूंनी असे काळे दिवस साजरे करायचे ठरवले, तर त्यांना ३६५ दिवसही पुरे पडणार नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

ram_mandir

१ फेब्रुवारी १९८६ या दिवशी फैजाबाद जिल्हा न्यायाधिशांनी रामजन्मभूमीचे टाळे त्वरित उघडण्याचा आदेश दिला. ही एक पुष्कळ महत्त्वाची आणि उत्साहवर्धक घटना होती. त्या वेळी सार्‍या देशाने दिवाळी साजरी केली. १४ फेब्रुवारी १९८६ या दिवशी देहलीत दुपारी जामा मशिदीतून नमाज पढून परतणार्‍या धर्मांधांनी दंगल केली. काश्मीरमध्ये हिंदूंची १०० मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. शिवाय अलीगढ, कानपूरसारख्या मुसलमानबहुल शहरांत दंगली झाल्या. १५ फेब्रुवारी १९८६ या दिवशी धर्मांधांनी ‘बाबरी मशीद अ‍ॅक्शन समिती’ची स्थापना केली. उत्तरप्रदेशातील सर्व मुसलमान आमदार पक्षभेद विसरून एकत्र आले. त्यांच्या एका शिष्टमंडळाने उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे बाबरी मशिदीला पुन्हा एकदा टाळे लावण्याची विनंती केली. मुसलमान नेते शहाबुद्दीन यांनी मुसलमानांना २६ जानेवारी १९८७ च्या प्रजासत्ताकदिनावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. अनेक मुसलमान नेत्यांनी या गोष्टीला त्यांचा विरोध असल्याचे घोषित केले.

करसेवकांना अयोध्येत येण्यापासून रोखणारे मुलायमसिंह शासन !

३० जून १९९० या दिवशी हरिद्वार येथे ‘विश्‍व हिंदु परिषदे’च्या वतीने पुढील कार्यक्रम ठरवण्यासाठी संत-महंतांची एक विशाल बैठक झाली आणि अयोध्येत करसेवा करण्यासाठी ३० ऑक्टोबर १९९० हा दिवस ठरवण्यात आला. देशाच्या कानाकोपर्‍यातून फार मोठ्या संख्येने करसेवक अयोध्येकडे रवाना झाले; पण उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यांनी करसेवकांना अयोध्येपर्यंत पोचू न देण्याचा चंग बांधला होता. अयोध्येकडे जाणारे सर्व मार्ग पोलीस सुरक्षा दलाने बंद केले. उत्तरप्रदेशच्या सीमेवर गाड्या थांबवून करसेवकांना बंदी केले गेले. अनेक गाड्या रहित केल्या. २९ ऑक्टोबरपर्यंत उत्तरप्रदेश शासनाने ७ लक्ष ५० सहस्र करसेवकांना अटक केली होती. या सर्व अडचणींवर मात करून ३० ऑक्टोबरपर्यंत सुमारे ५० सहस्र करसेवक अयोध्यानगरीत शिरण्यात यशस्वी झाले. मुलायमसिंह यांची ‘वहाँ एक परिंदा भी पर नही मार सकता’, ही वल्गना खोटी ठरली.

मुलायमसिंह शासनाने करसेवकांना बंदुकीच्या गोळ्यांनी टिपून मारले !

करसेवक अयोध्येत श्रीरामजन्मभूमीत प्रवेश करण्यात यशस्वी झाल्यामुळे मुलायमसिंह शासन फार खवळले होते. २ नोव्हेंबर १९९० या दिवशी सशस्त्र पोलीस दलाने नि:शस्त्र करसेवकांवर अमानुष गोळीबार केला. या वेळी रामकुमार आणि शरदकुमार हे दोन कोठारी बंधू आणि इतर अनेक करसेवकांना पोलिसांनी टिपून मारले.
– पु.के. चितळे (संदर्भ : साप्ताहिक ‘विवेक’ २४ मार्च २००२)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *