Menu Close

हिंदु धर्मप्रसार आणि धर्मरक्षण करणार्‍या धर्माभिमान्यांचा सोलापूर धर्मजागृती सभेत सत्कार

sidram_satkar
ह.भ.प. इंगळे महाराज यांच्याकडून सत्कार स्वीकारतांना श्री. सिद्राम चरकुपल्ली

सोलापूर : हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकांचे आयोजन करणारे धर्माभिमानी श्री. सिद्राम चरकुपल्ली यांनी धर्मसभेच्या सेवेमध्येही हिरीरीने सहभाग घेतला. त्यानिमित्त त्यांचा सत्कार ह.भ.प. इंगळे महाराज यांनी केला. श्री. प्रशांत सलगरे हे पायाने अधू असूनही त्यांनी सभेच्या प्रसारात उत्स्फूर्त सहभाग घेतला, तसेच गावकर्‍यांनाही ते सभेला घेऊन आले होते. श्री. सलगरे यांचा सत्कार ह.भ.प. इंगळे महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.

prashant_satkar
ह.भ.प. इंगळे महाराज यांच्याकडून सत्कार स्वीकारतांना श्री. प्रशांत सलगरे

विशेष : फेसबूकच्या माध्यमातूनही सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेचे प्रक्षेपण करण्यात आले. ११ सहस्रांहून अधिक लोकांनी याचा लाभ घेतला.

धर्मसभेला उपस्थित मान्यवर : विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड, कवठळे येथील सरपंच सुरेश नरोटे, मनसे विद्यार्थी सेनेचे अमर कुलकर्णी, शिंगडगांवचे सरपंच श्री. मल्लीकार्जुन पनशेट्टी, माढा भाजप तालुकाध्यक्ष योगेश पाटील

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *