Menu Close

या गावातील सब भूमी गोपालकी

राजस्थान : रंगरंगीलो राजस्थान अशी ओळख असलेल्या या राज्यातील अजमेर जिल्ह्यात देवमाली नावाचे एक अद्भूत गांव पर्यटकांचे आकर्षण बनू पाहते आहे. या गावात सर्व घरे मातीची बांधली गेली आहेत. म्हणजे या गावांत पक्के घर बांधण्याची ऐपत असलेले धनी लोकही कच्च्या मातीचीच घरे बांधतात कारण या गावात पक्के घर बांधले तर गावावर संकटे येतात व ते घर आपोआपच कोसळते असे अनुभव घेतले गेले आहेत. त्यामुळे आधुनिक काळातही हे गांव प्राचीन भारतातील एखाद्या खेड्याप्रमाणेच राहिले आहे.

या गावात देवनारायणाचे मंदिर आहे. हा विष्णुचा अवतार समजला जातो व गावातील सर्व जमीन या देवाच्या नावावर आहे. म्हणजे गावातील कुणाही ग्रामस्थाच्या नावावर जमिनीचा छोटा तुकडाही नाही. गेल्या ५० वर्षात या गावात एकही चोरी झालेली नाही व येथील घरांना दरवाजे नाहीत तशीच कुलुपेही नाहीत. गावातील समस्त लोक शाकाहारी आहेत. इतकेच नव्हे तर गावात लग्न असले तरी नवर्‍याला घोड्यावरून मिरविले जात नाही. असे केले तर गावावर संकटे येतात असे ज्येष्ठ लोक सांगतात. या गावाचे नागरिक स्वतःला एका पूर्वजाचे वंशज मानतात. गावात न सांगताच दारू बंदी पाळली जाते म्हणजे कुणीही दारूला स्पर्शही करत नाहीत. पूर्वजांनी वसविलेल्या या गावात लोक आनंदाने व समाधानाने राहत आहेत.

 संदर्भ : माझा पेपर

Tags : Hinduism

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *