होळेहोन्नूर (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन
होळेहोन्नूर : आता गावागावांत, राष्ट्रीय स्तरावर भ्रष्टाचार अधिक वाढला आहे. त्याला केवळ माता-पिता आणि गुरु हे तीन लोकच पालटू शकतात. या तिघांनी योग्य संस्कार केले, तर देशात आदर्श पिढी निर्माण होऊ शकते, असे प्रदिपादन अधिवक्ता सुब्रह्मण्य यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ डिसेंबरला येथील सत्यधर्म कल्याण मंदिरामध्ये हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला समितीचे श्री. विजय रेवणकर, रणरागिणी शाखेच्या सौ. कावेरी रायकर आणि सनातन संस्थेच्या सौ. सुकन्या आचार्य यांनी संबोधित केले.
या वेळी सौ. कावेरी रायकर म्हणाल्या, ‘‘जेव्हा पृथ्वीवर राक्षसांचे प्राबल्य वाढते, तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी दुर्गादेवी मारक रूप धारण करते. याचेच रूप असलेल्या रणरागिणी शाखेकडून महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकवण्यात येते.’’ सौ. सुकन्या आचार्य म्हणाल्या, ‘‘आज सर्व ठिकाणी जिहादी आतंकवाद्यांचा प्रभाव वाढत आहे. पुन्हा रामराज्य आणायचे असेल, तर धर्म आणि संस्कृती यांचे पालन करून धर्माचे रक्षण करण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे.’’ श्री. विजय रेवणकर म्हणाले, ‘‘भारतात हिंदूंची स्थिती शोचनीय झाली आहे. ही स्थिती पालटायची असेल, तर हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व हिंदूंनी संघटित भावाने हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी कटीबद्ध झाले पाहिजे.’’
क्षणचित्रे
१. अगरदहळ्ळी या गावातील एका शाळेच्या विद्यार्थ्यांचे होळेहोन्नूर येथे शिबीर होते. तेथील शिक्षकाला धर्मसभेविषयी माहिती मिळाल्यावर त्यांनी सर्व मुलांना कार्यक्रमस्थळी आणले आणि सर्व ग्रंथप्रदर्शन आणि फ्लेक्सप्रदर्शन दाखवले.
२. संवाद सभेत स्थानिक मंदिराच्या स्वच्छतेविषयी विचारल्यावर उपस्थितांपैकी एका शिक्षकाने स्वयंप्रेरणेने मंदिराच्या स्वच्छतेचे दायित्त्व घेतले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात