Menu Close

बडोदा (गुजरात) येथे धर्मांधांनी वरातीवर दगडफेक केल्याने हिंसाचार !

मोहल्ल्यातच हिंसाचार आणि दंगली का होतात, याचे उत्तर निधर्मीवादी अन् पुरोगामी देतील का ?

  • ५ पोलीस घायाळ
  • पोलिसांच्या वाहनावर गावठी बॉम्ब फेकले !

बडोदा – ७ डिसेंबरला मध्यरात्री येथील जुन्या शहरात मुसलमानबहुल फतेहपुरा मोहल्ल्यातून एका विवाहाची वरात जात असतांना त्यावर धर्मांधांनी दगडफेक केली. या वेळी झालेल्या हिंसाचारात एक चारचाकी आणि दुचाकी जाळण्यात आली, तर पोलिसांच्या वाहनावर गावठी बॉम्ब फेकण्यात आले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या हिंसाचारात ५ पोलीस घायाळ झाले. पोलिसांनी प्रथम दोन्ही गटांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या वाहनावर गावठी बॉम्ब फेकल्यावर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्यावर जमावाने दगडफेक चालू केली.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *