गवाणे, लांजा (रत्नागिरी) येथे हिंदूसंघटन मेळावा !
लांजा : आज हिंदूंसमोर इसिस, जिहादी आतंकवाद, लॅण्ड जिहाद, लव्ह जिहाद अशी अनेक संकटे आवासून उभी आहेत. आज राष्ट्र टिकले, तर समाज टिकेल आणि समाज टिकला, तर आपण टिकू शकतो. देशासमोरील ही संकटे आणि स्त्रियांवरील वाढते अत्याचार याला प्रतिबंध करायचा असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या जिल्हासेविका सौ. पल्लवी लांजेकर यांनी केले. तालुक्यातील गवाणे येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात त्या बोलत होत्या. या मेळाव्याचे सूत्रसंचालन डॉ. समीर घोरपडे यांनी केले. या मेळाव्याला १२५ धर्मप्रेमींची उपस्थिती होती.
सौ. लांजेकर म्हणाल्या, मी एकटा काय करणार?, असे म्हणून गप्प बसू नका ! असे अनेक एकटे एकत्र आले, तर राष्ट्रोद्धाराला वेळ लागणार नाही. स्वामी विवेकानंद म्हणाले होते, आपला दोष आपण भव्य-दिव्य असे काही करत नाही, यात नसून आपल्या आवाक्यातीलही आपण करत नाही, यात आहे. म्हणूनच आता लक्ष्यप्राप्तीपर्यंत आपल्याला निकराचे शौर्य दाखवण्याची, प्रतिकारक्षम रहाण्याची आणि संघटित रहाण्याची आवश्यकता आहे. आजर्यंत तर जेवढी स्थित्यंतरे झाली आहेत, त्या वेळी महिलांवरील अत्याचार किंवा त्यांचा अपमान हे त्याला मूळ कारण ठरले. आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे तरीही तिच्यावर होणारे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच आहेत. हे थांबायला हवे असेल, तर प्रत्येक स्त्रीला केवळ शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असलेली स्त्री नव्हे, तर आध्यात्मिकदृष्ट्याही सक्षम असलेली रणरागिणी व्हावे लागेल.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे बनून धर्मरक्षणासाठी हिंदूंनी सिद्ध होणे काळाची आवश्यकता ! – संजय जोशी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी भगवा फेटा बांधून, हातात भगवा ध्वज घेऊन त्यांचा जयजयकार करण्यावरच आम्ही जयंती साजरी करण्याचे समाधान मानतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोमाता, देवळे, हिंदु माता-भगिनी यांचे रक्षण केले. धर्मांतर, गोहत्या, देवळे उद्ध्वस्त करणार्यांना, हिंदु माता-भगिनींवर अतिप्रसंग करणार्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी कायमचा धडा शिकवला. त्यांचा हा पराक्रम आठवून धर्मरक्षणासाठी त्यांचे मावळे बनून हिंदूंनी सिद्ध होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. संजय जोशी यांनी केले.
श्रीे. जोशी म्हणाले, या देशात हिंदूंच्या धर्मभावनांना पायदळी तुडवून अल्पसंख्यांकांना मात्र तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले जात आहे. म.फि. हुसेन यांनी रेखाटलेली भारतमाता आणि हिंदूंच्या देवता यांच्या नग्न चित्रांचे प्रदर्शन लावण्यात येऊ नये, अशी तक्रार प्रविष्ट करायला गेल्यावर असे केल्यास हिंदूंसमोर झुकल्यासारखे होईल, असे सांगत पोलीस हिंदूंनाच दमदाटी करतात. डॉ. झाकीर नाईक यांनी भगवान श्री शंकर आणि भगवान श्री गणेश यांचा अवमान करणारी विधाने केल्याची तक्रार पुराव्यांसह रत्नागिरी जिल्ह्यातील ४ पोलीस ठाण्यांत प्रविष्ट करायला गेल्यावर त्याविषयी गुन्हा नोंद करून घेण्यात आला नाही. पुण्यात शिवजयंती, गणेशोत्सव साजरे करणार्या ४०० मंडळांना ध्वनीप्रदूषणाविषयी पोलिसांनी नोटिसा पाठवल्या, तर १०० जणांवर गुन्हे दाखल केले; मात्र न्यायालयाचा आदेश असूनही मशिदींवरील अवैध भोंगे काढून टाकण्याचे धाडस पोलीस दाखवत नाहीत. हिंदुहिताचा विचार करणारा एकही राज्यकर्ता गेल्या ७० वर्षांत या देशात निर्माण न झाल्याने, तसेच केवळ अल्पसंख्याकांचे लांगूलचालन आणि हिंदु धर्मियांवर सातत्याने अन्याय होत असलेली निरर्थक लोकशाही यांमुळे हिंदूंना आता संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करावे लागेल, यासाठी प्रत्येकाने प्रतिदिन १ घंटा राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी द्यावा. हिंदूसंघटन मेळाव्याच्या प्रारंभ शंखनाद करून झाला. त्यानंतर सौ. पल्लवी लांजेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात