सानपाडा : पूर्वी आक्रमकांच्या काळात देव, देश, धर्म यांवरील श्रद्धा, अभिमान आणि स्वतःच्या अंगीभूत गुणांनी स्त्रियांनी समाजाला आधार देऊन इतिहासात स्थान मिळवले. आजच्या स्त्रिया मात्र आपला दैदिप्यमान इतिहास विसरून मुलांना पाश्चात्य शिक्षण, कपडे, जीवनशैली यांविषयी प्रोत्साहन देतांना आढळतात. स्त्रियांनी गार्गी, जिजाऊ, अहिल्या, लक्ष्मीबाई यांचा आदर्श ठेवावा, असे आवाहन रणरागिणी शाखेच्या सौ. नयना भगत यांनी केले. येथील सेक्टर ८ येथे स्वामी समर्थ केंद्रात महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात स्वसंरक्षण आणि धर्मशिक्षण ही काळाची आवश्यकता या विषयावर त्या महिलांना मार्गदर्शन करत होत्या. या व्याख्यानाचा लाभ २५ महिलांनी घेतला.
या वेळी सौ. नयना भगत म्हणाल्या, स्त्रियांवरील अत्याचारांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आतंकवाद, लव्ह जिहाद यांत हिंदु स्त्रियांना लक्ष्य केले जात आहे. देश आणि धर्म यांची स्थिती अतिशय बिकट असतांना सध्या स्त्रिया पुरोगामी विचारवंतांच्या तथाकथित स्त्री-पुरुष समानतेच्या तथाकथित चळवळीला बळी पडतांना दिसतात. या दुष्टचक्रातून बाहेर येण्यासाठी हिंदु जनजागृती समितीची रणरागिणी शाखा स्त्रियांना स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि धर्मशिक्षण देऊन खर्या अर्थाने शिक्षित आणि सामर्थ्यवान करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे रणरागिणी शाखेकडून विनामूल्य चालवल्या जाणार्या स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि धर्मशिक्षणवर्गांचा लाभ घ्या.
श्री स्वामी समर्थ केंद्राचे श्री. किरण वाजगे यांनी या व्याख्यानासाठी जागा आणि अन्य साहित्य उपलब्ध करून देण्यास मोलाचे सहकार्य केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात