कराड : शहर पोलीस निरीक्षक श्री. जोतिराम गुंजवटे यांनी ‘३१ डिसेंबरच्या अपप्रकारांच्या विरोधात योग्य ती पावले उचलू’, असे आश्वासन हिंदुत्वनिष्ठांना दिले, तर कराड तालुका ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री. भोसले म्हणाले, ‘‘आम्ही शक्य ती उपाययोजना करू आणि असले अपप्रकार रोखू; परंतु जर तुम्हाला कोठे असे प्रकार दिसले, तर माझ्या भ्रमणध्वनीवर कळवा, आम्ही लगेच तेथे कारवाई करू. तुमचे उपक्रम चांगलेच आहेत !’’
ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान केल्यामुळे होणारे अपप्रकार रोखण्याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठांनी दिले. त्या वेळी कराड पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांच्या उपक्रमाचे कौतुक करून वरील उद्गार काढले.
या वेळी हिंदु एकता आंदोलन सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री. रूपेश मुळे, कराड भाजप युवा मोर्च्याचे उपाध्यक्ष श्री. गणेश कापसे, सनातन संस्थेचे श्री. लक्ष्मण पवार, श्री. पालेकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत आणि श्री. अणिल कडणे उपस्थित होते.
उंब्रज – ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करून युवक-युवती धिंगाणा घालतात. मद्यपान आणि पाश्चात्य संस्कृती यांचा युवकांवर अनिष्ट परिणाम होत असल्याने या अपप्रकारांवर प्रतिबंध घालावा, याविषयीचे निवेदन उंब्रज शहर पोलीस निरीक्षक यांच्या नावे ठाणे अमलदार लक्ष्मण जगधने यांना हिंदुत्वनिष्ठांनी दिले. या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे कराड तालुका अध्यक्ष आणि गोरक्षक श्री. महेश जाधव, हिंदु एकता आंदोलनाचे खटाव तालुका अध्यक्ष आणि गोरक्षक श्री. नितीन शिर्के, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात