-
प्रयाग येथे लव्ह जिहादचे प्रकरण
-
हिंदु नावाने केला विवाह
-
तक्रार नोंदवूनही पोलीस निष्क्रीय
-
पीडितेने स्वत:ची सुटका केली
हिंदु सहिष्णु असल्यामुळे धर्मांधांकडून हिंदु मुलींचे दिवसाढवळ्या अपहरण होते ! या विषयी कुणी का बोलत नाही ? हिंदु तरुणींनो, स्वरक्षणासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
प्रयाग (इलाहाबाद) : शहरात नुकतीच लव्ह जिहादची घटना समोर आली आहे. येथील कॅन्ट भागातील एका अल्पवयीन हिंदु मुलीला सरताज नावाच्या एका धर्मांध तरुणाने फूस लावून पळवून नेले. तिला दोन मास बंदी बनवून बनावट हिंदु नावाने तिच्याशी एका मंदिरात विवाह केला. त्यानंतर संधी साधून पीडितेने कुलूप तोडून पलायन केले आणि स्वत:चे घर गाठले. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले.
१. १५ वर्षीय हिंदु मुलगी कॅन्ट भागातील गणेशनगरात रहाणारी असून एका गरीब कुटुंबातील आहे.
२. २ नोव्हेंबर २०१५च्या सायंकाळी ती कामावर जात असतांना एक ऑटोरिक्षा तिच्या जवळ येऊन थांबली. त्यानंतर या रिक्षातून तिघांनी तिला पळवून नेले आणि मऊआइमा येथे धर्मांधाच्या बहिणीकडे कोंडून ठेवले.
३. त्या तरुणाने तिला स्वत:चे नाव शिवम् असून ती त्याला आवडल्याचे सांगितले, तसेच तिला लग्नासाठी मागणी केली. लग्नासाठी पीडितेने विरोध केल्यावर तिला मारहाण करण्यात आली.
४. आवाज काढल्यास तिची गळा दाबून हत्या करण्यात येईल, अशी धमकी दिली.
५. एका मंदिरात जाऊन तिच्याशी बलपूर्वक विवाह केला. त्यानंतर तिला कळले की तो शिवम् नसून सरताज आहे.
६. पीडितेने तिच्या मोबाईलवरून तिच्या आईला दूरध्वनीवरून या अपहरणाची माहिती दिली होती. तिच्या आईने अपहरणाच्या दुसर्या दिवशीच कँट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली होती; परंतु मोबाईल क्रमांक असतांनाही पोलिसांनी पीडितेला कह्यात घेतले नाही.
७. एक दिवस सरताज दारूच्या नशेत घराच्या दुसर्या मजल्यावर झोपला होता आणि त्याच्या बहिणीसह घरातील लोक बाहेरगावी गेले होते.
८. ही संधी साधून तिने दाराचे कुलूप तोडले आणि पळ काढला. या प्रकरणी माहिती कळताच हिंदुत्ववादी नेते द्विवेदी यांच्यासह तिने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलीस निरीक्षक एम्.एम्. अंसारी यांनी आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात