Menu Close

बेंगळुरू येथे ६० देशांतील सहस्रावधी लोकांनी हिंदु धर्म स्वीकारला !

विदेशातील चर्च ओस पडणे आणि तेथील सहस्रावधी ख्रिस्तींनी हिंदू होणे, यातून हिंदु धर्माचे आध्यात्मिक महत्त्व लक्षात येते ! भारतातील भोंदू पुरोगाम्यांना हे लक्षात येईल तो सुदिन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

बेंगळुरू : येथील स्वामी नित्यानंद मठामध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका धार्मिक विधीच्या वेळी जगभरातील ६० देशांतील सहस्रावधी लोकांनी हिंदु धर्म स्वीकारला. विविध धार्मिक विधी, जीवनपद्धती आणि पूजा-अर्चा करून विदेशी नागरिकांना हिंदु नावे देण्यात आली.
एखाद्याला हिंदु व्हायचे असल्यास पारंपरिक शैवपंथीय मठांमध्ये लाखो वर्षांपासून समय दीक्षा, विशेष दीक्षा, निर्वाण दीक्षा आणि आचार्य अभिषेक या ४ दीक्षांचा अवलंब केला जातो. गेल्या १० वर्षांत बेंगळुरू येथील स्वामी नित्यानंद मठामध्ये १० लक्षांपेक्षा अधिक विदेशी नागरिकांनी हिंदु धर्मात अधिकृतरित्या प्रवेश केला आहे.

नित्यानंद मठामध्ये नुकत्याच झालेल्या २१ दिवसीय ‘सदाशिवहोम’ या धार्मिक कार्यक्रमात सहस्रावधी विदेशी लोकांना हिंदु धर्माची दीक्षा देण्यात आली. ‘या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे लाखो लोकांची दु:खे, रोग आणि इतर कष्ट दूर झाले असून ते आनंदी जीवन जगत आहेत’, असे मठाकडून सांगण्यात आले.

स्वामी परमहंस नित्यानंद हे मदुराई मठाचे प्रमुख आहेत. ते महानिर्वाणी आखाड्याचे महामंडलेश्‍वर आहेत. तसेच ते नित्यानंद ज्ञानपिठाचे संस्थापक आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये योग आणि ध्यान यांचे अध्ययन केले जाते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *