ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप ! हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात रान उठवणार्या वृत्तवाहिन्या या वृत्ताविषयी गप्प का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : नोएडा आणि मेरठ या शहरांमधील ख्रिस्ती मिशनर्यांकडून चालवण्यात येत असलेल्या अनाथालयातील लहान मुलांनी बायबल वाचण्यास नकार दिला; म्हणून तेथील व्यवस्थापनाने त्यांना हात बांधून आणि पंख्यांना टांगून बेदम मारहाण केली अन् ४ दिवस उपाशी ठेवले. एका मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अशा ३० पीडित मुलांची सुटका केली. ही अनाथालये एम्यानुएल सेवा गटाच्या वतीने चालवण्यात येत आहेत.
१. या मुलांनी दिलेल्या माहितीवरून ती सर्व गरीब घरांतील होती. त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आले.
२. त्यांना ३ वर्षे अनाथालयात कोंडून ठेवण्यात आले. त्यांना देण्यात येणार्या अन्नात झुरळ सापडत असत. त्यांचे जीवन कारागृहापेक्षाही कठीण होते, असे मुलांनी सांगितले.
३. या मुलांना एका मासात केवळ १५ मिनिटे पालकांना भेटण्याची अनुमती मिळत असे. त्यांना बायबलमधील उतारे पाठ करण्याशिवाय इतर काहीच शिकवण्यात येत नव्हते.
४. जेव्हा अनाथालयाला कुणी मान्यवर भेट देण्यास येत असत, तेव्हा या मुलांना नवीन कपडे घालून रांगेत उभे करण्यात येत असे आणि त्यांना बायबलमधील उतारे म्हणून दाखवण्यास सांगितले जायचे. जर कुणी वाचन करण्यात चुकला, तर त्याला नंतर काठीने आणि पट्ट्यांनी बेदम मारहाण केली जात होती.
५. तेथील व्यवस्थापक मुलांना उघड्या फरशीवर आणि उंदरांच्या मलमूत्रात झोपायला बाध्य केले जात होते. त्यांना बाहेर जाण्याची अनुमती नव्हती.
६. बायबलचे उतारे म्हणण्यात चूक झाली, तर ३ दिवस अन्न मिळत नव्हते.
७. पीडित आईच्या जबाबानुसार तिची भेट देहलीच्या एका रुग्णालयात जोसुआ देवराज नावाच्या व्यक्तीशी झाली. त्याने तिला मुलांचा सांभाळ करून त्यांना सनदी अधिकारी बनवू, असे खोटे आश्वासन दिले होते.
८. एका सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी सत्यप्रकाश यांनी पोलिसांसह नोयडा (देहली) येथील नया हैबतपूर आणि मीरत येथे धाडी घातल्यावर वरील परिस्थिती सत्य असल्याचे सांगण्यात आले.
९. या मुलांची सुटका केल्यावर त्यांच्या घरी अनाथालयाचा कर्मचारी वर्ग गेला आणि त्यांनी मुलांना परत नेण्याचा प्रयत्न केला. त्यांना विरोध करणार्या मुलांच्या कुटुंबियांना लाठ्यांनी मारहाण करण्यात आली.
१०. पोलिसांनी बिसाराख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अनाथालयाच्या ३ कर्मचार्यांना अटक केली आहे, असे ठाण्याचे प्रभारी अश्विनी कुमार यांनी सांगितले.
११. खरा सूत्रधार जोसुआ देवराज अद्याप मोकळा असून त्याने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात