-
कल्याण (जिल्हा ठाणे) येथे सळसळत्या भगव्या वातावरणात ‘हिंदु महामण्डलम्, कल्याणच्या वतीने आयोजित धर्मजागरण सभा !
-
हिंदु धर्मजागृती सभा विशेष ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी दुमदुमला आसमंत !
कल्याण : १ सहस्र ४०० वर्षांपूर्वी जगात इस्लाम धर्म अस्तित्वात नव्हता. २००० वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्म अस्तित्वात नव्हता. त्यापूर्वी केवळ सनातन वैदिक हिंदु धर्मच होता. भारत हे हिंदूंचे स्थान आहे. अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत शांत बसणार नाही, असे प्रतिपादन गोशमहल, तेलंगण येथील भाजपचे आमदार तथा श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. राजासिंह ठाकूर यांनी केले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आरमाराचा (नौदलाचा) आरंभ कल्याणनगरीतून केला. हा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कल्याणनगरीत लाल चौकी येथील नमस्कार मंडळाच्या पटांगणात ‘हिंदु महामण्डलम्’च्या वतीने धर्मजागरण सभा पार पडली. या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर जैन मुनी पू. निलेशचंद्र विजयजी, ‘इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट’चे राष्ट्रीय अध्यक्ष पारस राजपूत, बहेन दुर्गा डिफेन्सच्या संस्थापिका सौ. मंजुश्री वरादी, विश्व हिंदु सेवेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारत शासनाच्या महिला अन् बालकल्याण मंत्रालयाचे सदस्य श्री. रविंद्र द्विवेदी उपस्थित होते. हिंदु धर्म आणि संस्कृती अबाधित राखण्याच्या संकल्पाने सभेचा आरंभ करण्यात आला. या सभेला १ सहस्र ५०० धर्माभिमान्यांची उपस्थिती होती.
श्री. राजासिंह ठाकूर या वेळी म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी गाय कापणार्या कसायांचे हात छाटले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास प्रत्येक तरुणाने वाचायला हवा. शिवाजी जन्मावा; पण शेजारी अशी सध्याच्या मातांची मानसिकता आहे. छत्रपती शिवाजी महाराज शत्रूशी गनिमीकाव्याने लढले. आज प्रत्येक तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण अंगीकारणे आवश्यक आहे. जे लढतात त्यांचाच इतिहास घडतो. धनंजय देसाई यांच्यासारखे हिंदूंचे नेते देव, देश आणि धर्म यांविषयी बोलले म्हणून कारागृहात आहेत. करागृहात असलेले निरपराध हिंदुत्वनिष्ठ नेत्यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती पूर्ण प्रयत्न करत आहे. तरीही या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने सर्वांनी सकाळी उठल्यावर पहिल्यांदा देवाकडे त्यांच्या सुटकेसाठी प्रार्थना करूया. सिमी या आतंकवादी संघटनेने ‘लव्ह जिहाद’ चालू केला आहे. हिंदु मुलींना याविषयी सतर्क करणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. प्रत्येकाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण मनात ठेवून पुढे जायचे आहे आणि धर्मरक्षणाचे कार्य करायचे आहे. देशात आतंकवादी मारले गेल्यानंतर गळा काढणारा आणि दंगलींमध्ये हिंदूंच्या विरोधात उभा रहाणारा एम्आयएम् हा देशद्रोही पक्ष आहे. अशा देशद्रोही पक्षावर बंदी घालायला हवी. जे ‘भारत माता की जय’ म्हणणार नाहीत त्यांना भारतात रहाण्याचा अधिकार नाही.’’ या वेळी श्री. राजासिंह ठाकूर यांनी उपस्थितांना उभे रहाण्यास सांगून धर्मरक्षणाचे कार्य करण्याविषयी प्रतिज्ञा म्हणवून घेतली.
हिंदूंच्या सर्व समस्यांचे हिंदु राष्ट्र हेच उत्तर ! – श्री. पारस राजपूत, राष्ट्रीय अध्यक्ष, इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट
जगात हिंदूंचे एकही राष्ट्र नाही. इसिस या आतंकवादी संघटनेने भारताचे खुरासान करण्याचे ठरवले आहे. यांच्या विरोधात लढण्यासाठी हिंदु सिद्ध आहेत का ? सध्या संपूर्ण जगाला इस्लामिक आतंकवादाचा धोका आहे.
याकूबसारख्या आतंकवाद्याच्या अंत्ययात्रेत सहस्रोंच्या संख्येने लोक सहभागी होतात. यातूनच ‘आतंकवादाचा धर्म कोणता आहे’ हे लक्षात येते. ‘भगवा आतंकवाद’ असे म्हणण्यात येते; परंतु प्रत्यक्षात सर्व हिंदू संविधान आणि कायदा यांचे पालन करणारे आहेत. त्यांची लढाई सनदशीर आहे. त्यामुळे ‘भगवा आतंकवाद’ हा आमच्यावरील आरोप असून तो आमचा अपमान आहे.
पंतप्रधानांनी गोरक्षकांविषयी केलेल्या विधानानंतर सर्वच गोरक्षकांकडे दोषी म्हणून पहाण्यात आले. नोटाबंदीच्या निर्णयानंतर इस्लामला मानणारे आणि कर चुकवणारे यांचे कंबरडे मोडले. यामुळे भ्रष्टाचार दूर होईल; पण आतंकवाद नष्ट करण्यासाठी जिहादची मूळ विचारसरणी नष्ट करायला हवी. हे काम आम्हा हिंदूंचे आहे. सर्वांनी हिंदु राष्ट्र येण्यासाठी प्रार्थना करूया. वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे.
मी आधी हिंदु मग जैन आहे ! – जैनमुनी पू. निलेशचंद्र विजयजी महाराज
देशाला शत्रूंपेक्षा घरभेद्यांपासून धोका आहे. जैन साधू असून मी धर्मरक्षणार्थ रस्त्यावर आलो आहे; कारण जैन मुली ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात अडकत आहेत. महावीर जयंतीला धर्मांध जैन मंदिरांसमोर गायीचे शीर कापून टाकतात. आज गाय, गीता आणि गोपी म्हणजे हिंदूंच्या मुली सुरक्षित नाहीत. राजासिंह ठाकूर यांच्यामुळे हे प्रकार अल्प होत आहेत. त्यांच्यामुळे जैन मंदिरे सुरक्षित आहेत. मी आधी हिंदु आणि मग जैन आहे. महाराष्ट्राला श्री. राजासिंह ठाकूर यांच्यासारख्या संभाजीराजांची आवश्यकता आहे !
जपमाळ घेतलेले हिंदू प्रसंगी स्वसंरक्षण करण्यासाठी सिद्ध होतील ! – सौ. मंजुश्री वरादी, संस्थापक, बहेन दुर्गा डिफेन्स
आज मी शांतीचे आवाहन नाही, तर क्रांतीचा जयघोष करण्यासाठी उभी आहे. प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही शस्त्र धारण केले होते. वेळ आल्यास हातात जपमाळ घेतलेले आम्हा हिंदूंना स्वसंरक्षणार्थ लढा द्यावा लागेल. आज हिंदूंना ‘लव्ह जिहाद’चा धोका आहे. हिंदु माता-भगिनींनी त्यांच्यातील शक्ती ओळखायला हवी.
देशातील घरभेद्यांना बाहेर काढल्याशिवाय आतंकवाद नष्ट होणार नाही ! – श्री. रविंद्रजी द्विवेदी, राष्ट्रीय अध्यक्ष, विश्व हिंदु सेवा आणि सदस्य, महिला अन् बालकल्याण मंत्रालय, भारत शासन
विशेष क्षणचित्रे !
१. सभा चालू होण्यापूर्वी गोमूत्राने व्यासपीठ आणि पटांगण यांची शुद्धी करण्यात आली, तसेच उपस्थित सर्व धर्माभिमान्यांना कुंकवाचा टिळा लावण्यात आला. वक्त्यांचा सत्कार करतांना त्यांना तुळशीचे रोप देण्यात आले.
२. सभेच्या आरंभी भगवान शिव, श्रीराम आणि सरस्वतीदेवी यांचे स्मरण करून ज्ञानमुद्रेत ‘ॐ’काराचे ३ वेळा उच्चारण करण्यात आले.
३. सभेसाठी आलेल्या काही पत्रकारांनी सभेसाठी धर्मदान दिले !
४. ‘माऊली ढोल पथका’ने ढोल-ताशांच्या गजरात वक्त्यांचे स्वागत केले.
५. सभेपूर्वी पोलीस सभास्थळी येऊन ‘‘ध्वनीमापकयंत्र आणा, यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करूया’’, अशी अरेरावी करत होते.
(आझाद मैदानात धर्मांधांकडून मार खाणारे आणि त्यांच्यावर कारवाई न करणारे पोलीस हिंदुत्वनिष्ठांना खोट्या कारणांमध्ये गोवण्यासाठी टपलेले असतात, हेच यातून दिसून येते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)
सभेपूर्वी मोठ्या वाहनफेरीच्या माध्यमातून प्रसार करण्यात आला होता. सभेत बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती या संघटना, तसेच भाजप आणि शिवसेना या पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात