कौलगे (जिल्हा सांगली) येथील हिंदु धर्मजागृती सभेसाठी ३०० हून अधिक हिंदूंची उपस्थिती
कौलगे : आज हिदूंच्या मंदिरांचा पैसा अन्य धर्मियांना देण्यात येत आहे. हिंदूच्या सणांच्या वेळी कायद्याचा बडगा दाखवणारे शासन अन्य धर्मियांवर तशी कारवाई करत नाहीत. आज हिंदूंची जी दु:स्थिती झाली आहे, ती दूर करण्यासाठी हिंदु राष्ट्राची निर्मिती करणे हाच उपाय आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. मधुरा तोफखाने यांनी केले. येथील श्री हनुमान मंदिरासमोर पार पडलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत त्या बोलत होत्या. या सभेत रणरागिणी शाखेच्या सौ. गौरी खिलारे यांनीही मार्गदर्शन केले. या सभेसाठी ३०० हून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.
या वेळी सौ. गौरी खिलारे म्हणाल्या, ‘‘शौर्याने ओतप्रत भरलेला इतिहास असतांना तो आपल्याला शिकवला जात नाही. त्याचाच परिणाम म्हणून इसिस आणि आतंकवाद यांचे संकट आपल्यासमोर आहे. संकटांना सामोरे जाण्यासाठी शौर्यजागरण करण्याची आवश्यकता आहे.’’ सभेचा प्रारंभ श्रीशिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्री. राजू पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाला. सभेचे सूत्रसंचालन कु. उज्ज्वला खेराडकर यांनी केले, तर हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा परिचय श्री. प्रशांत चव्हाण यांनी करून दिला. सभेसाठी ह.भ.प. यशवंत धोंडीराम फडतरे यांची कार्यक्रमास वंदनीय उपस्थिती लाभली, तर सरपंच श्री. बाबासाहेब पाटील हे प्रारंभीपासून उपस्थित होते.
सनातन ही हिंदु धर्म डोक्यावर घेऊन समाजमन जागृत करण्याचे कार्य आरंभणारी देशातील एकमेव संस्था ! – ह.भ.प. फडतरे महाराज
सनातन संस्था ही देशातील एकमेव संस्था आहे जिने हिंदु धर्म डोक्यावर घेऊन समाजमन जागृत कराण्याचे कार्य आरंभले आहे. लोक अभ्यास न करता संस्थेविषयी अपसमज पसरवतात, हे चुकीचे आहे. संस्थेचा अध्यात्माचा पाया भक्कम असल्यानेच संस्थेचे कार्य अविरत चालू आहे, असे गौरोवोद्गार ह.भ.प. फडतरे महाराज यांनी या वेळी काढले.
आजपर्यंत असा कार्यक्रम आम्ही पाहिला नाही ! – ग्रामस्थ
‘‘आजपर्यंत असा कार्यक्रम आम्ही पाहिला नाही. या गावात एकही अन्य धर्मीय कुटुंब नाही त्यामुळे गावातील वातावरण धर्माचरणास अनुकूल आहे’’, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी सभेनंतर व्यक्त केली.
क्षणचित्रे
१. ७८ वर्षे वयाचे श्री. अप्पा कबाडे यांनी धर्मप्रसाराच्या कार्यासाठी प्रतिदिन २ घंटे वेळ देऊन उत्स्फूर्त साहाय्य केले. (वयाच्या ७८ व्या वर्षी हिंदु धर्मासाठी वेळ देणारे श्री. अप्पा कबाडे यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. कार्यक्रमास ध्वनीक्षेपक यंत्रणा, तसेच मंडपव्यवस्था करून देणारे श्री. राजू पाटील यांनी ‘‘हे धर्माचे कार्य असून यासाठी माझे आभार मानायला नकोत’’, असे सांगितले. (असे हिंदुत्वनिष्ठ हीच हिंदु धर्माची शक्ती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. क्रांतीकारकांच्या प्रदर्शनास गावातील दोन शाळांच्या विद्यार्थ्यांनी भेट देऊन विषय समजून घेतला.
४. हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे यांनी उपस्थितांकडून हिंदु राष्ट्रासाठी प्रतिज्ञा म्हणून घेतली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात