Menu Close

सनातन संस्थेला माझा सदैव पाठिंबा – स्वामी श्री इंद्रदेवेश्‍वरानंद सरस्वती

स्वामी श्री इंद्रदेवेश्‍वरानंद सरस्वती (उजवीकडे) यांची भेट घेतांना समितीचे कार्यकर्ते

हडसपर : सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य चांगले आहे. या कार्याला माझे सदैव आशीर्वाद आहेत. सनातन संस्थेला माझा नेहमी पाठिंबा आहे, असे आशीर्वचन युगप्रवर्तक क्रांतीकारी राष्ट्रीय संत यज्ञपिठाधीश्‍वर धर्मसम्राट विद्यावाचस्पती महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ महंत स्वामी श्री इंद्रदेवेश्‍वरानंद सरस्वती महाराज (मथुरा निवासी) यांनी दिले. श्रीमद्भागवत कथेच्या निमित्ताने ते हडपसर येथे आले असता सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी सर्वश्री प्रशांत पाटील, साईराज पवळे आणि कु. कार्तिकी पवळे यांनी महाराजांना संस्था आणि समिती यांच्या कार्याची माहिती सांगितली, तसेच व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणार्‍या आणि यंदाच्या वर्षी पुण्यात होणार असलेल्या सनबर्न या पाश्‍चात्त्य संगीत महोत्सवाविषयी समितीने छेडलेल्या आंदोलनाविषयीही अवगत केले. या वेळी त्यांनी अशा विकृतीविरोधात चीड व्यक्त करून अयोग्य कृतींच्या विरोधात समाजप्रबोधन करतच असल्याचे सांगितले.

संदर्भ  : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *