जनतेचा हा पैसा गोंधळ घालणार्या लोकप्रतिनिधींची सर्व संपत्ती जप्त करून वसूल करण्यात यावा !
नवी देहली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील संपूर्ण २१ दिवसांपैकी एकही दिवस नोटाबंदीमुळे कामकाज न होता अधिवेशन १६ डिसेंबरला समाप्त झाले. या कालावधीत केवळ राज्यसभेत दिव्यांग कायदाच संमत होऊ शकला. या व्यतिरिक्त एकही विधेयक संमत होऊ शकले नाही. २०१० पासून झालेल्या संसदेच्या सगळ्या अधिवेशनांपैकी हे अधिवेशन सर्वांत अल्प कामकाज झालेले अधिवेशन ठरले आहे. संसदेच्या कामकाजावर प्रतिदिन जवळपास ११ कोटी १७ लाख रुपये खर्च होतात. २१ दिवसांत जवळपास २२३ कोटी रुपयांची हानी झाली आहे.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात