Menu Close

बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवरील अत्याचार थांबवा ! – हिंदु धर्माभिमानी

राष्ट्रीय हिंदू आंदोलन करतांना हिंदु धर्माभिमानी

बेंगळुरू : बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेंगळुरू शहरातील टाऊन हॉल येथे ११ डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयंत, श्रीराम सेनेचे श्री. प्रितेश, सनातन संस्थेच्या सौ. गायत्री राव, हिंदुत्वनिष्ठ श्री. व्यंकटस्वामी रेड्डी यांनी आंदोलनाला संबोधित केले. या वेळी त्यांनी ‘बांगलादेशी हिंदूंच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने बांगलादेशी सरकारवर दबाव आणला पाहिजे. अन्यथा येत्या ३० वर्षांत बांगलादेशात एकही हिंदु शिल्लक रहाणार नाही’, असे प्रतिपादन केले. या वेळी विविध संघटनांचे अनेक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *