-
गावठी बॉम्बचा सर्रास वापर * हिंदूंच्या ६० घरांना आग लावून लुटले
-
६० हिंदू परिवारांचे पलायन * पोलीस निष्क्रीय मंदिरावर बॉम्बफेक
हावडा : बंगालमधील हावडा जिल्ह्यातील धुलवाडाजवळील बानिजोपोला या गावात १३ डिसेंबरला महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून त्यांच्या ६० घरांना आग लावली. तसेच त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तूंची लुटमार केली. आक्रमण करतांना धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात गावठी बॉम्बचा वापर केला. त्यांनी पोलिसांनाही घटनास्थळी पोचू दिले नाही. ५ घंटे धर्मांधांकडून येथे लुटमार करून हैदोस घालण्यात येत होता. येथील एका मंदिरातही गावठी बॉम्ब फोडण्यात येऊन त्याची तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर येथील ६० हिंदू परिवारांनी पलायन केले आहे. आक्रमणाची मालिका ३ दिवस चालू होती. सध्या येथे कलम १४४ लावण्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत कोणालाही अटक केलेली नाही. आक्रमण करणार्यांपैकी काही जण येथील दोन मदरशांमधील होते, तसेच काही जण जमाते इस्लामी संघटनेचे होते, असे म्हटले जात आहे. येथील सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांनी आक्रमणकर्त्यांना ओळखून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. या आक्रमणाविषयी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. पीडित हिंदूंना हानीभरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
धर्मांधांच्या उलट्या बोंबा !(म्हणे) ‘हिंदूंनी मिरवणुकीवर आक्रमण केले !’
एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने सांगितले की, मुसलमानांनी म्हटले आहे की, हिंदूंनी त्यांच्या मिरवणुकीवर नियोजनपूर्वक आक्रमण केले. (असे सांगून पोलीस या दंगलीचे खापर हिंदूंवर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नंतर ते हिंदूंनाच अटक करतील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
प्रसारमाध्यमांचा हिंदुद्वेष !
१३ डिसेंबरला झालेल्या या आक्रमणाचे वृत्त हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांकडून जाणीवपूर्वक दडपण्यात आले. एखाद-दुसर्या प्रसारमाध्यमाने वृत्त देतांना त्याचे गांभीर्य लक्षात येईल, अशी माहितीही दिली नाही.
नोटाबंदीनंतर जनतेला होत असलेल्या त्रासावरून देहलीत जाऊन मोर्चा काढणार्या ममता(बानो) यांना त्यांच्या राज्यातील हिंदूंवर धर्मांधांकडून होणारे अत्याचार आणि त्यामुळे त्यांना करावे लागणारे पलायन दिसत नाहीत का कि ते हिंदू आहेत आणि राजकीयदृष्ट्या या विषयामुळे त्यांच्या पक्षाला लाभ होणार नाही म्हणून त्याकडे त्या दुर्लक्ष करत आहेत ?
बंगालमध्ये सातत्याने हिंदूंवर धर्मांधांकडून आक्रमणे होत असतांना झोपलेले केंद्र सरकार, मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पक्ष !
- १३ डिसेंबरच्या पैगंबर जयंतीला बंगालमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमणे केली ! सरकार कोणतेही असले, तरी हिंदूंवरील आक्रमणे रोखली जात नाहीत, ही स्थिती हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता स्पष्ट करते !
- देशात असहिष्णुता वाढली आहे आणि त्याला धर्मांध कारणीभूत आहेत !
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात