इतर पंथियांच्या श्रद्धास्थानांचे अशी विटंबना करण्याचे धाडस फॉर्च्यून मासिक आणि अॅमेझॉन आस्थापन करेल का ? – संपादक, हिंदुजागृती
- अमेरिकेतील हिंदूंचा तीव्र विरोध !
- फॉर्च्यून मासिकाने व्यक्त केली दिलगिरी !
मुंबई : अमेरिकेतील फॉर्च्यून मासिकाच्या मुखपृष्ठावर अॅमेझॉन आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजस यांचे विष्णूच्या अवतारातील छायाचित्र छापल्याने एकच वादंग सुरु आहे.
अमेरिकेत राहणाऱ्या अनेक भारतीयांनी या छायाचित्राला मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. भारतात अॅमेझॉनचा व्यवसाय वाढीस लागावा यासाठी फॉर्चूनने हे मुखपृष्ठ छापले आहे. मात्र, भारतात यामुळे बरीच नाराजी दिसून येते आहे.
मासिकाच्या मुखपृष्ठावर जेफ बेजसला भगवान विष्णूच्या अवतारात दाखविण्यात आले आहे. मुखपृष्ठावर असणाऱ्या छायाचित्राध्ये बेजस यांनी हातात कमळाचे फूल घेतलेले दाखवण्यात आले आहे. सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये या मुखपृष्ठाबाबत बरीच टीका सुरु आहे.
काही दिवसांपूर्वीच एका जाहिरातीसाठी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे विष्णुच्या अवतारातील छायाचित्र छापण्यात आले होते. त्याच्यावर गुन्हाही नोंद झाला आहे. नुकताच धोनीविरोधात अजामीनपात्र वॉरंटही दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, वादानंतर या मासिकाचे मुख्य संपादक अॅलन मरे यांनी माफी मागितली आहे.
संदर्भ : एबीपी माझा