Menu Close

स्पेनची राजधानी माद्रीदमध्ये गंगा आरती लोकप्रिय !

विदेशी लोकांना भारतीय संस्कृतीचे महत्त्व कळते, तेवढे भारतियांना कळते का ?

माद्रीद (स्पेन) – गंगा आरती केवळ भारतातच लोकप्रिय आहे, असे नाही तर युरोपमधील शहरांमध्येही तेवढीच लोकप्रिय आहे. स्पॅनिश लोकही याला अपवाद नाहीत. वाराणसीच्या गंगा घाटावर सायंकाळच्या वेळी ज्याप्रमाणे आरतीचा नित्यक्रम असतो, त्याचप्रकारे स्पेनची राजधानी माद्रीद येथील बनारस हॉटेलमध्येही प्रतिदिन ही आरती केली जाते. त्यासाठी त्यांनी विशेष तलाव बनवून घेतला आहे.

माद्रीद येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या बनारस नावाने हॉटेल आहे. संपूर्ण शहरात शाकाहारी भोजन मिळण्याचे हे एकमेव स्थान आहे. या ठिकाणी सायंकाळी आरती झाल्यावरच भोजन वाढले जाते. येथे भारतातील विविध राज्यांतील अनेक पदार्थ उपलब्ध आहेत. भारतीय पर्यटकांसाठी स्पेन विशेष महत्त्व ठेवून आहे. येथील सरकारही भारतीय पर्यटकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांच्या मते स्पॅनीश लोकांना भारतीय संस्कृतीचे वेड आहे.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *