Menu Close

इस्लामी आतंकवादी ख्रिस्त्यांना लक्ष्य करत आहेत ! – डोनाल्ड ट्रम्प

  • डोनाल्ड ट्रम्प थेट बोलतात आणि निवडणुकीत निवडूनही येतात; मात्र भारतातील राजकारणी असे बोलू शकत नाहीत; कारण त्यांना निवडणुकीत निवडून यायचे असते !
  • गेल्या ३ दशकांत भारतातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सोडले, तर एकाही राजकारण्याने ‘इस्लामी आतंकवादी हिंदूंना लक्ष्य करतात’, असे एकदाही म्हटलेले नाही, हे लक्षात घ्या !

वॉशिंग्टन – इसिस आणि अन्य इस्लामी आतंकवादी त्यांच्या जागतिक जिहादाच्या अंतर्गत ख्रिस्ती, त्यांचे अनेक समुदाय आणि श्रद्धास्थाने येथे सातत्याने आक्रमणे करत आहेत. या आतंकवाद्यांचा आणि त्यांच्या जागतिक नेटवर्कचा पृथ्वीवरूनच नाश केला पाहिजे. आपण स्वातंत्र्यप्रेमी हे अभियान पूर्ण करण्यासाठी साहाय्य कराल, असे आवाहन अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. तुर्कस्थानमध्ये रशियाच्या राजदुताची करण्यात आलेली हत्या आणि जर्मनीमध्ये ख्रिसमस बाजारामध्ये झालेले आक्रमण याविषयावर ते बोलत होते. रशियाच्या राजदुताच्या हत्येसाठी त्यांनी इस्लामी आतंकवाद्यांनाच उत्तरदायी ठरवले.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *