Menu Close

बर्लिन हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली

बर्लिन – इसिस या दहशतवादी संघटनेने जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये नाताळसाठी सजलेल्या बाजारपेठेमध्ये ट्रक घुसवून घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली असून प्रचंड गर्दीच्या ख्रिसमस मार्केटमध्ये हेतुत: ट्रक घुसवल्यामुळे १२ जण ठार झाले तर ४८ जण जखमी झाले. यासंबंधी वृत्त इसिसशी संबंधित अमाक न्यूज एजन्सीने दिले आहे.

ऑनलाइन वक्तव्य जाहीर करत आपल्याच दहशतवाद्याने बर्लिनमध्ये हल्ला करत नागरिकांना टार्गेट केल्याचे इसिसने म्हटले आहे. मात्र या दहशतवाद्याची ओळख त्यांनी उघड केलेली नाही. बर्लिनमधील मार्केटमध्ये सोमवारी रात्री ट्रक घुसल्याने १२ जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला दहशतवाद्यानेच घडवला असल्याचे जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी मंगळवारी म्हटले होते.

स्त्रोत : माझा पेपर

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *