Menu Close

संपूर्ण पाकिस्तान नष्ट होईल आणि मुळासकट आतंकवाद संपेल, असे सर्जिकल स्ट्राईक पंतप्रधानांनी करावेत – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

जळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारार्थ नांद्रा बुद्रुक येथे प्रचारसभा !

नांद्रा बुद्रुक (जळगाव) – ज्याप्रमाणे वर्ष १९८९ मध्ये काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंना आतंकवादामुळे विस्थापित व्हावे लागले, तशी परिस्थिती आपल्याकडेही निर्माण होत आहे, याची आपण जाणीव ठेवायला हवी. न्यायालयाच्या आदेशानुसार ठिकठिकाणी मंदिरे पाडली जात आहेत; पण अनधिकृत मशिदी आणि चर्च यांविषयी बोटचेपे धोरण आखले जाते. यासाठी हिंदूंनी सतर्क असले पाहिजे. मोदींनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे आम्हाला कौतुकच आहे; पण त्यांनी संपूर्ण पाकिस्तानच नष्ट होईल आणि मुळासकट आतंकवाद संपेल, असे सर्जिकल स्ट्राईक करावेत, असे मार्गदर्शन येथे आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारसभेत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी लव्ह जिहाद, धर्माचरण, पाश्‍चात्यांचे अंधानुकरण या विषयांवर मार्गदर्शन केले. सभेतील वक्त्यांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन श्री. हेमराज पाटील यांनी केले, तर दीपप्रज्वलन श्री. सुनील घनवट आणि कु. रागेश्री देशपांडे यांनी केले. सभेला ५०० हून अधिक धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती होती. सभेसाठी सकाळी गावातून वाहनफेरी काढण्यात आली होती. त्यामुळे सभेला पुष्कळ उपस्थिती लाभली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *