Menu Close

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

आंदोलनात उपस्थित धर्माभिमानी

यवतमाळ : येथील हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने श्री दत्त चौक येथे १७ नोव्हेंबरला दुपारी ४ ते सायं. ६ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन झाले.

या वेळी रेल्वे स्थानकांवर क्रूरकर्मा अकबराची चित्रे रंगवण्यास विरोध करणे, बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेचे सूत्र संयुक्त राष्ट्रसंघात मांडणे आणि इस्लामिक बँकिंगचा धर्मांध प्रस्ताव देणार्‍या रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍याची चौकशी करून त्यावर आवश्यक ती कारवाई करावी, या विषयांवर आंदोलन करण्यात आले.

हिंदु जनजागृती समितीने लक्षात आणून दिलेल्या धोक्याची नोंद घ्या ! – श्री. लक्ष्मणलाल खत्री, हिंदू महासभा

या वेळी हिंदू महासभेचे श्री. लक्ष्मणलाल खत्री म्हणाले की, २५ वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने शहाबानो प्रकरणात निकाल देतांना म्हटले होते की, स्त्री-पुरुष, भाषा यांत विषमता ठेवता येणार नाही. यासाठी ‘समान नागरी कायदा’ आणणे आवश्यक आहे.

आतापर्यंत एकाही प्रधानमंत्र्यांनी देशात समान नागरी कायदा आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. या आंदोलनाच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीने लक्षात आणून दिलेल्या धोक्याची नोंद घ्या, असे आवाहन श्री. खत्री यांनी केले.

या आंदोलनास वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. शिरभाते महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली. पतंजली योगपीठाचे श्री. संजय चांभारे, सनातनचे साधक यांसह ३० जणांची उपस्थिती होती. या वेळी देशाचे परराष्ट्रमंत्री, रेल्वेमंत्री आणि अर्थमंत्री यांना देण्यासाठीच्या निवेदनांवर ४०० जणांनी स्वाक्षर्‍या केल्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *