कागल (कोल्हापुर) : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या ध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने पावले उचलावीत, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ जानेवारी या दिवशी येथील नायब तहसीलदार श्री. शिवाजी गवळी यांना देण्यात आले. या वेळी श्री. गवळी यांना ध्वनीचित्रचकती दाखवून प्रजासत्ताक दिनादिवशी होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर श्री. माळी यांनी हेे निवेदन आणि ध्वनीचित्रचकती गटशिक्षणाधिकारी अन् तालुका शिक्षणाधिकारी यांना देण्यात येईल. तसेच शालेय केंद्राच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय पोहोचवला जाईल, असे आश्वाासन दिले.
हे निवेदन देतांना श्री शिवप्रतिष्ठानचे कागलचे कार्यवाहक सर्वश्री विजय आरेकर, अमोल साकेकर, कागलचे शिवसेना तालुकाप्रमुख अशोकराव पाटील, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री किरण दुसे, प्रीतम पोवार, दीपक भोपळे, अक्षय बुरसे, रोहित पाटील, सदाशिव सणगर, प्रमोद आरेकर, चेतन चव्हाण, अजय लोहार आदी धर्माभिमानी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात