Menu Close

मंत्र आणि मंदिरे हे आजार बरे करणारे ऊर्जास्रोत आहेत ! – पू. (डॉ.) रघुनाथ शुक्ल

पुणे : संस्कृती ही भारतियांचा वेद असून संस्कृतीतून अध्यात्म कळते. ज्योतिष हे विज्ञान आहे. मंत्र आणि मंदिरे हे आजार बरे करणारे ऊर्जास्रोत आहेत, असे मार्गदर्शनपर प्रतिपादन पू. (डॉ.) रघुनाथ शुक्ल यांनी केले. (तथाकथित बुद्धिप्रामाण्यवाद्यांना चपराक ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) ‘भारतीय संस्कृती आणि विज्ञान’ या विषयावर येथील गोपाळ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने ५ ते ८ डिसेंबर या कालावधीत बहुश्रुत व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. त्यामध्ये पहिल्या दिवशी ‘अध्यात्म आणि विज्ञान’ या विषयावर ते मार्गदर्शन करत होते.

पू. (डॉ.) रघुनाथ शुक्ल म्हणाले, ‘‘आपल्याला अध्यात्माचे ज्ञान व्हायला पाहिजे. जेथे पिंड आणि ब्रह्मांड यांचे नाते जुळते, तो आत्मज्ञानी होतो. विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेतच आयुष्यात काय करायचे आहे, ते ठरवून त्याचे चिंतन केले पाहिजे. पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहारात घडणार्‍या गोेष्टींचा अभ्यास करायला पाहिजे. चांगले काम केल्याचे फळ चांगलेच मिळते आणि ते सर्व देणारा देवच आहे, असा भाव ठेवायला हवा.’’

तुळस ही बुद्धिमान असल्याने तिचा जास्तीत जास्त उपयोग करणे आवश्यक ! – डॉ. प्रदीप कुरुलकर

आपल्याला ‘इ-कोलाय’ हा विषाणू कमी प्रमाणात आवश्यक असतो. तो विषाणू नुसताच ठेवल्यावर बुरशीमध्ये (फंगस) वाढ होते; पण हा विषाणू तुळशीसह ठेवल्यावर पाहिजे इतकाच वाढतो. तसेच तुळसही २ धातू निर्माण करते. मातीमध्ये धातू नसतांना तुळस नवीन धातू निर्माण करते, यातूनच तुळस बुद्धिमान आहे, हे समजते. यासाठीच पूर्वजांनी तुळस अधिकाधिक प्रमाणात उपयोगात आणली, असे प्रतिपादन डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी केले. बहुश्रुत व्याख्यानमालेमध्ये दुसर्‍या दिवशी ‘भारतीय विज्ञान – आज आणि उद्या’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी त्यांनी ‘तुळशीचे विज्ञानातील महत्त्व’ सिद्ध करणारे शोधनिबंध दाखवले. ते पुढे असेही म्हणाले की, गंगेच्या पाण्यात कोणताही विषाणू टिकत नाही. हे जरी खरे असले, तरी यावर संशोधनाच्या माध्यमातून अभ्यास करणे आवश्यक आहे.

इतिहास समजून घेतल्यास उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळेल ! – नीलेश ओक

आपण इतिहास समजून घेतल्यास त्यातील चुका टाळून उज्जवल भविष्याकडे वाटचाल करण्याची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन नीलेश ओक यांनी केले. व्याख्यानमालेतील तिसर्‍या दिवशी ‘खगोलशास्त्र आणि इतिहासातील रहस्ये’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी श्री. ओक यांनी रामायण आणि महाभारत या धर्मग्रंथातील श्‍लोकांमध्ये उल्लेखलेल्या ग्रहस्थितीवरून त्यातील घटनांच्या काळासंबंधी निष्कर्ष काढण्याची पद्धती विशद केली.

संशोधनाचे महत्त्व विशद करतांना श्री. ओक यांनी सांगितले की, इतिहासाचे अधिकाधिक अचूक ज्ञान मिळाल्यास समाजाला आपल्या बलस्थानांची माहिती होऊन आत्मविश्‍वास वाढण्यास साहाय्य होईल. व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी ‘विज्ञानाची अनोखी शाखा-भूविज्ञान’ या विषयावर डॉ. विद्याधर बोरकर यांनी सखोल माहिती दिली.

सत्राच्या शेवटी झालेल्या प्रश्‍नोत्तरांच्या भागामध्ये डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी सांगितले की, शास्त्रीय दृष्टिकोनातून ढगांच्या बीजारोपणामुळे प.पू. नाना काळे यांनी ऑक्टोबर ते मे या कालावधीत २० ठिकाणी पर्जन्ययाग केले. त्यामुळे यंदा पाऊस वेळेत आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Tags : Hinduism

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *