Menu Close

श्रीशिवप्रतिष्ठानच्या धारकर्‍यांनी ख्रिसमसच्या नावाखाली होणारा धर्मप्रसार रोखला !

श्रीशिवप्रतिष्ठानच्या धारकर्‍यांची अभिनंदनीय कृती !

सांगली : येथील राममंदिर चौकात २२ डिसेंबरच्या रात्री ७.३० वाजता काही ख्रिस्ती ख्रिसमसच्या नावाखाली बायबलचे वाटप करणे, पदपथावरच येशूचे महत्त्व सांगणे, तसेच अन्य प्रकारच्या कृतींद्वारे ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत होते. ही गोष्ट श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी श्री. नितीन चौगुले आणि त्यांचे धारकरी यांना समजली. त्यांनी तेथे जाऊन या सर्वांना खडसवले. अनुमती पत्राची तपासणी केली असता त्यांच्याकडे केवळ धार्मिक कार्यक्रम करण्याची अनुमतीच होती; मात्र तरीही ते रस्त्यावर ध्वनीक्षेपक लावून धर्मप्रसार करत होते. यामुळे संतप्त झालेल्या धारकर्‍यांनी या सर्वांना कार्यक्रम बंद करण्यास भाग पाडले.

१. ख्रिस्ती येणार्‍या-जाणार्‍या लोकांना विनामूल्य बायबलचे वाटप करत होते. यातून एकप्रकारे हिंदूंना ख्रिस्ती धर्म कसा चांगला आहे, हे सांगण्याचा प्रयत्न चालू होता.

२. काही जण सांताक्लॉजचा वेश करून प्रबोधनाच्या नावाखाली पत्रके वाटप करण्याचे काम करत होते.

३. या वेळी सर्वश्री नितीन काळे, हणमंतराव पवार, माजी आमदार श्री. नितीन शिंदे, तसेच अन्य धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी ख्रिस्ती ऐकण्यास सिद्ध नव्हते. नंतर धारकर्‍यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे त्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला.

४. तणाव वाढत असल्याने पोलीसही घटनास्थळी आले. असे प्रकार महापालिका क्षेत्रात काही ठिकाणी घडत असल्याचेही नागरिकांनी या वेळी सांगितले.

५. ‘आम्ही जगात प्रेम देण्यासाठी आलो आहोत. आम्ही केवळ येशूचे महत्त्व सांगत आहोत. आम्हाला विनाकारण विरोध होत आहे. तुम्ही आम्हाला मारले, तरी आम्ही तुम्हाला प्रेमच देणार’, अशा प्रकारच्या बतावण्या त्यांच्यापैकी उपस्थित एक महिला करत होती. (केवळ भारतात नव्हे, तर जगात अनेक ठिकाणी ख्रिस्त्यांनी कशा प्रकारे लोकांची फसवणूक करून, आमिषे दाखवून, तसेच गोव्यात बळजोरी करून धर्मांतर केले, याची सहस्रो उदाहरणे पहायला मिळतातत. व्यक्तीस्वातंत्र्य याचा अर्थ लोकांची दिशाभूल करून धर्मांतर करणे असे नव्हे. त्यामुळे अशा प्रकारे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणार्‍या लोकांवर पोलीस प्रशासनाने स्वत:हून कृती करणे अपेक्षित आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *