हिंदु जनजागृती समितीच्या मध्यप्रदेश येथील धर्मप्रसाराच्या कार्याचा ८ ते २७ नोव्हेंबर २०१६ या कालावधीमधील आढावा
१. हस्तशिल्प मेळ्यात ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन
‘११ ते २१.११.२०१६ या कालावधीत उज्जैन येथील ‘कालिदास अॅकडमी’च्या पटांगणात जिल्हा पंचायत समितीच्या वतीने आयोजित हस्तशिल्प मेळ्यात सनातन संस्थेचे विविध विषयांवरील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले.
२. मध्यप्रदेश शासन आणि ‘प्रज्ञाप्रवाह’ या संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यशाळेत समितीच्या कार्यकर्त्यांचा सहभाग
भोपाळ येथे १२ ते १४.११.२०१६ या कालावधीत मध्यप्रदेश शासन आणि ‘प्रज्ञाप्रवाह’ या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘लोकमंथन’ या तीन दिवसीय कार्यशाळेत समितीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेत राष्ट्राशी निगडित विविध समस्यांविषयी तज्ञांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांना समितीच्या कार्याची माहिती देण्यात आली.
३. ‘धर्मरक्षक संघटने’चे अध्यक्ष श्री. विनोद यादव यांच्या पुढाकाराने समितीच्या एका कार्यक्रमाचे आयोजन
भोपाळ येथील वाजपेयीनगर येथे ‘धर्मरक्षक संघटने’च्या वतीने समितीच्या एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आयोजनासाठी संघटनेचे अध्यक्ष श्री. विनोद यादव यांनी पुढाकार घेतला. यात प्रत्येक १५ दिवसांनी धर्मशिक्षणवर्ग घेण्याचे ठरवले.
४. उज्जैन येथे समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांचे मार्गदर्शन
अ. उज्जैन येथील श्री. भूपेंद्र गुलाटी आणि श्री. संजीव पांचाळ यांनी इंदिरानगर येथे समितीच्या एका कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तत्पूर्वी येथील ‘पुरुषोत्तम सागर’ या ऐतिहासिक तलावाच्या काठी सामूहिक आरती करण्यात आली.
आ. उज्जैन येथील समितीच्या संकेतस्थळाचे वाचक श्री. मनोज पटेल यांनी त्यांच्या परिचयाच्या लोकांसाठी एका बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी ५० कि.मी. अंतरावरूनही काही जण आले होते. या बैठकीत १५ दिवसांनी एकदा धर्मशिक्षणवर्ग घेण्याचे निश्चित करण्यात आले.
५. उज्जैन नगर निगमचे सभापती श्री. सोनू गेहलोत यांनी येथील स्मशानभूमीत ‘मृत्यू आणि मृत्योत्तर क्रियाकर्म’
यांविषयी धर्मशिक्षण फलक लावण्यास अनुमती देणे
उज्जैन नगर निगमचे सभापती श्री. सोनू गेहलोत यांनी येथील स्मशानभूमीत ‘मृत्यू आणि मृत्यूत्तर क्रियाकर्म’ यांविषयी धर्मशिक्षण फलक लावण्यासाठी अनुमती दिली. श्री. गेहलोत हे रात्री एका कार्यक्रमाहून आल्यानंतर त्यांना धर्मशिक्षण फलकाचा विषय सांगितल्यावर ते लगेच आम्हाला घेऊन स्मशानभूमीत आले आणि त्यांनी तेथील विविध जागा दाखवून त्यांचा वापर धर्मशिक्षणविषयीचे फलक लावण्यासाठी किंवा भिंती रंगवण्यासाठी सांगितले. या वेळी ते म्हणाले, ‘‘सिंहस्थ पर्वात केवळ सनातन संस्थेने धर्मशिक्षण देण्यासाठी रंगवलेल्या भिंती अजून जशाच्या तशा आहेत. अन्य संघटनांनी विज्ञापने रंगवलेल्या भिंतींचा रंग निघून गेला.’’
६. भोपाळ येथील माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता आणि संचार विश्वविद्यालयाच्या डॉ. मोनिका वर्मा अन् फ्रान्सचे प्रसिद्ध
मनोविज्ञानी डॉ. सर्ज ले गिरिक यांना रामनाथी आश्रमाला भेट देण्याचे निमंत्रण
भोपाळ येथील माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता आणि संचार विश्वविद्यालयाच्या ‘संज्ञापन शोध’ (Department of Communication Research) विभागाच्या प्रमुख डॉ. मोनिका वर्मा यांनी फ्रान्सचे प्रसिद्ध मनोवैज्ञानिक डॉ. सर्ज ले गिरिक यांचा परिचय करून दिला. समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. श्री. गिरिक हे भारत आणि युरोप यांच्या भटक्या विमुक्त जातीत कलात्मक समानतेवर संशोधन करत आहेत. या वेळी श्री. गिरिक आणि डॉ. मोनिका वर्मा यांना रामनाथी आश्रमाला भेट देण्याचे निमंत्रण दिले.
७. जबलपूर येथे हिंदु सेवा परिषदेने आयोजित केलेल्या सभेत समितीचे श्री. रमेश शिंदे आणि सनातन संस्थेचे श्री. आनंद जाखोटिया यांचे मार्गदर्शन
२०.११.२०१६ या दिवशी जबलपूर येथे ‘एक भारत अभियान – कश्मीर की ओर’च्या अंतर्गत विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी हिंदु सेवा परिषदेने सभेचे आयोजन केले होते. या सभेत समितीचे श्री. रमेश शिंदे आणि सनातन संस्थेचे श्री. आनंद जाखोटिया यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या ठिकाणी हिंदु सेवा परिषदेच्या अध्यक्षांनी उपस्थितांना वर्ष २०१७ चे सनातन पंचांग भेट दिले. येथे सनातन संस्थेची अनमोल ग्रंथसंपदा आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
८. समितीच्या कार्यकर्त्यांनी श्री गुप्तेश्वर महादेव मंदिराचे महामंडलेश्वर (डॉ.) स्वामी मुकुंददासजी महाराज यांचे आशीर्वाद घेणे
या सभेनंतर सर्व वक्त्यांनी येथील प्रभु श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या श्री गुप्तेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेतले. या मंदिराचे महामंडलेश्वर (डॉ.) स्वामी मुकुंददासजी महाराज यांचेही दर्शन घेऊन ‘एक भारत अभियान – कश्मीर की ओर’साठी त्यांचा आशीर्वाद घेतला, तसेच महाराजांना रामनाथी आश्रमाला भेट देण्याचे निमंत्रण दिले.’
– श्री. योगेश व्हनमारे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती, मध्यप्रदेश. (डिसेंबर २०१६)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात