Menu Close

चेरत्तला (केरळ) : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कडविल श्री महालक्ष्मी मंदिरात धर्माचरण या विषयावर प्रवचन !

चेरत्तला (केरळ) : येथील कडविल श्री महालक्ष्मी मंदिरात १५ ते २५ डिसेंबर या कालावधीत कनकधारा महायज्ञ आणि दशलक्षार्चन करण्यात येत आहे. त्या निमित्ताने २० डिसेंबरला हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना तिथे प्रवचन देण्यास संधी मिळाली. समितीच्या वतीने कु. अदिती सुखटणकर यांनी ‘धर्माचरण या विषयावर प्रवचन केले. ‘आज प्रत्येक व्यक्ती, समाज अन् हिंदु धर्म यांची स्थिती खूप वाईट आहे. याचे कारण अधर्माचरण आहे आणि ते दूर करून धर्मावर आलेली ग्लानी दूर करायला धर्माचरणच आवश्यक आहे’, असे कु. अदिती सुखटणकर यांनी सांगितले. धर्माचरणाच्या काही सोप्या पद्धती, जसे शास्त्रानुसार देवळात दर्शन करणे, कुंकू लावण्याची पद्धत, काळानुसार कुलदेवतेचे आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व याविषयीही सांगण्यात आले. या प्रवचनाचा लाभ २५० भाविकांनी घेतला.

क्षणचित्रे

१. प्रवचनाच्या ठिकाणी सनातनचे सात्त्विक उत्पादन आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला.

२. प्रवचनात ‘नमस्कार करण्याची योग्य पद्धत’ सांगत असतांना काही उपस्थित भाविक स्वतः तशी कृती करून बघत होते.

३. प्रवचनानंतर काहींनी शंकानिरसन करून घेतले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *