हिंदुत्वनिष्ठ संघटनांची गोव्यातील अझिलो रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे मागणी
शासकीय कार्यालयांमध्ये हिंदु कर्मचारी बहुसंख्य असूनही श्री सत्यनारायण पूजेसारख्या धार्मिक कृती केल्यास आवई उठवणारे रुग्णालयांत सर्रास होणार्या अशा अवैध धर्मांतराच्या प्रकाराविषयी काही का बोलत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
म्हापसा : येथील अझिलो रुग्णालयात हिंदु रुग्णांच्या असाहाय्यतेचा लाभ उठवून त्यांचे धर्मांतर करणार्या ‘बिलिव्हर्स’च्या प्रचारकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. गीता काकोडकर यांच्याकडे केली. त्यानंतर ‘रुग्णालयातील या घटनांची चौकशी करण्याची, तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधितांवर लक्ष ठेवावे’, असा आदेश वैद्यकीय अधीक्षक डॉ. गीता काकोडकर यांनी रुग्णालयाच्या प्रमुख व्यवस्थापकाला दिला. या वेळी शिवसेना, स्वराज्य, संस्कृती रक्षा समिती, रणरागिणी, हिंदु जनजागृती समिती आणि गोमंतक मंदिर अन् धार्मिक संस्था महासंघ या संघटनांचे प्रतिनिधी आणि हिंदु धर्माभिमानी यांची उपस्थिती होती. सर्वश्री जयेश थळी, सिद्धार्थ मांद्रेकर, नीलेश केणी, सिद्धेश केणी, एकनाथ म्हापसेकर, सुरेश वेर्लेकर, किशोर राव, अंकित साळगावकर, निखिल, सौ. अंजली नायक, सौ. विशाखा म्हांबरे, सौ. शुभदा केणी, सौ. शोभा मेनन आदींचा या वेळी सहभाग होता. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी उपरोल्लेखित मागणी करणारे एक निवेदनही वैद्यकीय अधीक्षक डॉ. गीता काकोडकर यांच्याकडे सुपुर्द केले.या निवेदनात म्हटले आहे.
अझिलो रुग्णालयात येणार्या रुग्णांचा ‘बिलिव्हर्स’चे प्रचारक पुढीलप्रमाणे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असतात . . .
१. हिंदू रुग्णांना ‘हिंदूंच्या देवतांची भक्ती करू नका, तर ‘जिझस’ची भक्ती केल्यास आजार बरा होईल’, असे सांगून हिंदूंची बुद्धी भ्रष्ट करतात.
२. ‘बिलिव्हर्स’ची पुस्तके नि:शुल्क वाटतात.
३. विशेषत: धर्मांतरित झालेल्या हिंदूंचे अनुभव कथन करत असतात. पैशांचे आमिष दाखवून धर्मांतरित केले जाते.
४. एखाद्या शासकीय रुग्णालयात असे प्रकार चालणे हे संतापजनक आहे. हे प्रकार तातडीने रोखण्यासाठी रुग्णालयात येणार्या ‘बिलिव्हर्स’च्या प्रचारकांना रुग्णालयात प्रवेशबंदी करावी, या आशयाचे फलक प्रवेशद्वारावर ठळकपणे लावावे, नियम मोडणार्यांवर कठोर कारवाई करा, ‘बिलिव्हर्स’च्या प्रचारकांना त्यांचे प्रसारसाहित्य उदा. पुस्तके, पत्रके आदी यांचे रुग्णालयात वाटप करण्यास बंदी घालून त्या आशयाचा फलक प्रवेशद्वारावर लावावा, अशा मागण्या करण्यात आल्या.
५. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींना या वेळी रुग्णालयातील एका सभागृहात ‘मदरमेरी’ची मोठी मूर्ती आणि समोर ठेवण्यात आलेली फंडपेटी, तसेच रुग्णालयात अनेक ठिकाणी लावण्यात आलेले क्रॉस आणि मदर मेरीची चिन्हे दिसून आली.
६. आपले शासन निधर्मी असूनही एखाद्या शासकीय रुग्णालयात विशिष्ट धर्माचा प्रचार करणारा हा प्रकार रोखण्याची हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मागणी केली असता रुग्णालयाच्या अधीक्षकांनी यासंदर्भात योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात