हिंदूंच्या संघटित कृतीचा परिणाम !
नेवाडा : कॅलिफोर्नियास्थित ‘केस इनहाऊस’ या आस्थापनाकडून ‘ऑनलाईन’ विक्री करण्यात येत असलेल्या उत्पादनांवर श्री गणेशाचे चित्र छापून हिंदु देवतांचे विडंबन केले जात होते. हिंदूंच्या देवतांच्या या अवमान प्रकरणी हिंदूंनी निषेध व्यक्त केला होता. हिंदूंच्या विरोधानंतर या आस्थापनाने हिंदु देवतांची चित्रे असलेल्या उत्पादनांची विक्री थांबवली आहे.
कुत्र्याचा पलंग, कुत्र्यासाठी चटई, पायपुसणी, स्नानागृहातील चटई, लेगिंग्स (स्त्रियांचा पोशाख), योग चटई इत्यादी वस्तूंवर श्री गणेशाचे चित्र छापण्यात आले होते. या वस्तूंवर हिंदु देवतांची चित्रे छापणे अयोग्य आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावनांचा अनादर झाला आहे. तेव्हा हिंदु देवतांची चित्रे असलेल्या उत्पादनांची विक्री तात्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी अमेरिकेतील हिंदु धार्मिक नेते श्री. राजन झेद यांनी एका निवेदनाद्वारे केली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात